RBI चा मोठा खुलासा ! ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची राजधानी नवी दिल्लीत २०१८-१९ मध्ये एटीएमद्वारे फसवणुकीच्या १७९ पेक्षा जास्त घटना समोर आल्या असून आरबीआयच्या आकडेवारीनुसार एटीएम फसवणुकीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांत दिल्ली भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या रिपोर्टनुसार, या फसवणुकीच्या गुन्ह्यांत आतापर्यंत २ कोटी ९० लाख रुपयाची लूट करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि तमिळनाडू लोकांच्या तुलनेत दिल्लीतील लोकांची कमी फसवणूक करण्यात आली आहे. गुन्हा करणाऱ्यांनी आता आपला मोर्चा एटीएम डेबिट कार्डच्या माध्यमातून लूट करण्याकडे वळविला असल्याचे पोलीस आणि सायबर क्राईम विशेष तज्ज्ञांनी सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात वापर केल्या जाणाऱ्या एटीएम डेबिट कार्ड आणि पॉइंट-ऑफ-सेल मशीनवरून लूट केली जाते.

लगेच तक्रार करा

आपल्या बरोबर एटीएम किंवा ऑनलाईन फसवणूक सारख्या घटना घडल्यास तत्काळ बँकेला या संबंधी सूचना देऊन तत्काळ कार्ड ब्लॉक करायला सांगावे. त्यामुळे जर तुमची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले तर बँक तुम्हाला तात्काळ नुकसान भरपाई देईल.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे करा

१) एटीएम कार्ड द्वारे पैसे काढायला गेल्यास कॅमेऱ्यांची तपासणी करा.
२) ज्या ठिकाणी कार्ड स्वॅप केले जाते, तेथे हलवून पाहा जर तेथे कॅमेरा लागला असेल तर ते निघेल.
३) तुमचा मोबाईल नंबर एटीएम कार्डशी जोडून घ्यावा.
४) एटीएमच्या बाहेर येण्याआधी क्लियर बटन आठवणीने दाबावे.
५) मशिनमधून बाहेर येणारी स्लिप तुमच्याकडे ठेवा, तिथेच टाकून देऊ नका.
६) पैसे काढल्यानंतर तिथेच उभे राहून मोजू नका
७) पिन टाकताना मशीनच्या जवळ उभे राहा. किंवा हाताने झाकण्याचा प्रयत्न करा.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like