RBI नं बदलले कर्ज घेण्याचे नियम, ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही स्टार्टअप साठी लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रायोरिटी सेक्टर लँडिंगशी संबंधित नवीन नियम लागू केले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना देखील होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या संशोधित नियमांनुसार 50 कोटींपर्यंतचं लोन शेतकऱ्यांना सोलर प्लांटस् लावण्यासाठी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटस् साठी मिळू शकणार आहे.

आरबीआयने सांगितलं की नव्या नियमांनुसार प्रायोरिटी सेक्टरमध्ये घेतल्या जाणाऱ्या लोनमध्ये भौगोलिक असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

सोबतच ज्या जिल्ह्यांमध्ये प्रायोरिटी सेक्टरमध्ये दिल्या जाणाऱ्या लोनचा फ्लो अपेक्षेपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी तो अधिक वाढवण्यात आला आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमांनुसार नविकरणीय ऊर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील क्रेडीट फ्लो वाढेल. दुसरी गोष्ट नविकरणीय ऊर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर साठी दिल्या जाणाऱ्या लोनची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.