रंग लागलेल्या नोटांबाबत RBI चा नियम काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना रंग लावून आंनद साजरा केला जातो. मात्र होळीचा सण साजरा करताना काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खेळताना आपले वॉलेट संभाळणे महत्त्वाचे असते. कारण नोटांना रंग लागण्याची शक्यता असते. त्यात आपण स्वतः रंग लागलेल्या नोटा स्वीकारत नाही. तसंच समाजात एक समज आहे की रंग लागलेल्या नोटा बाद होतात. किंवा बँका त्या घेत नाही. मात्र याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

रंग लागलेल्या नोटांबाबत RBI चा नियम काय ?

खरंतर होळीनंतर दुकानदार किंवा आपण स्वत: रंग लागलेल्या नोटा घेणं टाळतो. रंग लागलेल्या नोटा खऱ्या की खोट्या हे ओळखणं अवघड असतं. मात्र तुमच्याकडे जर रंग लागलेल्या किंवा फाटलेल्या नोटा असल्या, तरी घाबरण्याचं कारण नाही. कारण या नोटा तुम्ही बँकेत जाऊन बदलून घेऊ शकता. कोणतीही बँक या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ३ जुलै २०१७ मध्ये एक नोटिफिकेशन काढलं होतं. हे नोटिफिकेशन ज्या नोटा फाटल्या आहेत, रंग उडाला आणि किंवा रंग लागलेल्या नोटांसाठी आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

कोणत्या नोटा बँका बदलून देणार नाहीत ?

१. कोणत्याही नोटेवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राजकीय संदेश लिहिला असेल, तर अशा नोटा बँका स्वीकारणार किंवा बदलून देणार नाहीत. आरबीआय नोटाबदली नियमावली २००९ नुसार, अशा नोटा रद्द केल्या जातील. कोणतीही बँक अशा नोटा घेणार नाहीत. ती नोट पूर्णत: रद्द होईल.

२. ज्या नोटा जाणीवपूर्वक फाडल्या असतील, त्या नोटा बँक बदलून देणार नाही. जाणीवपूर्वक फाडलेल्या नोटांची पडताळणी करणं अवघड असतं. चुकून फाटलेल्या नोटांना नीट पाहिल्यास त्या ओळखता येतात.

दरम्यान, होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या नोटा बँका घेणार नाही, असा मेसेज सध्या व्हायरलं होत आहे. मात्र यात काही तथ्य नाही. त्यामुळे होळी बिनधास्त खेळा, पण खिशातील नोटांची काळजी आवश्य घ्या.

You might also like