RBI Rules | बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणार्‍यांनी लक्ष द्यावे ! RBI नं बदलला FD शी संबंधीत ‘हा’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही सुद्धा बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आवश्यक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी FD शी संबंधीत महत्वाच्या नियमात बदल(RBI Rules) केला आहे. RBI ने बँकांमध्ये Fixed Deposit चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विना दावा रक्कमेवर व्याजाच्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमानुसार, जर मॅच्युरिटीची तारीख पूर्ण झाली तरी सुद्धा रक्कमेवर क्लेम केला नाही तर यावर व्याज कमी मिळेल. RBI Rules | rbi changed bank fd rules unclaimed amount on maturity of deposits know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RBI ने सर्क्युलरमध्ये म्हटले की, हा निर्णय घेण्यात आला आहे की, जर फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर (FD maturity) झाले आणि रक्कम घेतली गेली नसेल आणि ती विना दावा बँकेत पडलेली असेल
त्यावर व्याजदर बचत खात्याच्या हिशेबाने किंवा मुदत ठेवीच्या परिपक्वतेवर ठरलेला व्याजदर, जे कमी असेल ते देय असेल.

नवीन नियम सर्व बँकांना लागू

नवीन नियम सर्व व्यवसायिक बँका, लघु अर्थ बँक, सहकारी बँक, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवीवर लागू होईल. मुदत ठेव ती रक्कम आहे,
जी बँकांमध्ये एका निश्चित कालावधीसाठी ठराविक व्याजावर ठेवली जाते.
यामध्ये आवर्ती, संचयी, पुनर्निवेश ठेव आणि रोख प्रमाणपत्र सारख्या ठेवींचा सुद्धा समावेश आहे.

गुंतवणुकीसाठी पसंतीची आहे FD

चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी बहुतांश लोक एफडी पसंत करतात.
हा गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय मानला जातो.

Web Title : RBI Rules | rbi changed bank fd rules unclaimed amount on maturity of deposits know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nagpur Police News | SPU मधील पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ