RBI Rules | बँकेने फाटलेल्या, झिजलेल्या नोटा बदलण्यास दिला नकार तर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : RBI Rules | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार (RBI Rules) कोणतीही बँक फाटलेल्या, कापलेल्या चलनी नोटा (Mutilated Currency Notes) बदलण्यास नकार देऊ शकत नाही. इतकेच नव्हे, यावर कपात सुद्धा केली जाणार नाही. जर एखादी बँक असे करण्यास नकार देत असेल तर तिच्याविरूद्ध कारवाई सुद्धा करता येऊ शकते.

जर तुमच्याकडे अशा नोटा असतील तर त्रस्त होण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अशा नोटांच्या बदल्यात पूर्ण पैसे मिळतील. रिझर्व्ह बँकेचे (RBI Rules) याबाबत काय नियम आहेत जाणून घेवूयात…

रिझर्व्ह बँकेने (RBI) फाटक्या-तुटक्या चलनी नोटा बदलण्याची मार्गदर्शकतत्त्व तयारी करण्यात आली आहेत. फाटक्या-तुटक्या चलनी नोटा देशातील कोणत्याही बँकेत बदलता येऊ शकतात. यासाठी तुमच्या होम ब्रँचमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

अशा चलनी नोटा बदलण्यास नकार देणार्‍या बँकेविरूद्ध (RBI Rules) कारवाई केली जाऊ शकते, परंतु याच्या काही अटी सुद्धा आहेत. नोट जेवढ्या खराब स्थितीत असेल तिची किंमत तेवढी कमी होत जाईल.

काय आहेत नोटा बदलण्याचे नियम?

जर तुमच्याकडे 5, 10, 20, 50 सारख्या कमी मूल्याच्या फाटक्या-तुटक्या चलनी नोटा असतील तर त्यांचा किमान 50 टक्के भाग असणे आवश्यक आहे. असे असल्यास तुम्हाला त्या नोटेचे पूर्ण मूल्य मिळेल.

तर, 50 टक्केपेक्षा कमी भाग असल्यास काहीही मिळणार नाही. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 5 रुपयांची फाटकी नोट असेल आणि तिचा 50 टक्के भाग सुरक्षित असेल तर त्या बदल्यात पूर्ण 5 रुपये मिळतील.

Viral News | पतीला ‘कुत्रा’ बनवून रेल्वे स्टेशनवर घेऊन गेली महिला, गळ्यात साखळी बांधून फिरवले; जाणून घ्या प्रकरण

रिझर्व्ह बँकेनुसार, जर तुमच्याकडे 20 पेक्षा जास्त फाटक्या-तुटक्या चलनी नोटा आहेत आणि त्यांचे एकुण मूल्य
5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर बदलण्यासाठी ट्रांजक्शन फी सुद्धा द्यावी लागेल.
नोट बदलण्यासाठी जाण्यापूर्वी पहा की तिच्यात गांधीजींचा वॉटरमार्क, गव्हर्नरची सही आणि सीरियल नंबर सारखे सिक्युरिटी सिम्बॉल्स असावेत.
जर तुमच्याकडील फाटक्या नोटेत हे सर्व सिम्बॉल असतील तर बँकेला नोट बदलून द्यावीच लागेल.

अनेक तुकड्यात विभागलेली नोट कशी बदलावी?

आरबीआयने खुप जास्त तुकड्यांमध्ये विभागलेल्या चलनी नोटा बदलण्याचा सुद्धा नियम बनवला आहे.
मात्र, त्या बदलण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. यासाठी तुम्हाला आरबीआयच्या ब्रँचमध्ये पोस्टाने या नोटा पाठवाव्या लागतील.

यामध्ये तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर, ब्रँचचे नाव, आयएफएससी कोड, नोटेची किंमत इत्यादी माहिती द्यावी लागेल.

रिझर्व्ह बँक फाटक्या नोटांचे काय करते?

रिझर्व्ह बँक तुमच्याकडून घेतलेल्या फाटक्या-तुटक्या चलनी नोटा चलनातून हटवते.
त्या ठिकाणी नवीन नोटा छापण्याची जबाबदारी आरबीआयची असते. अगोदर या नोटा जाळल्या जात होत्या.

मात्रा आता त्यांचे छोटे-छोटे तुकडे करून रि-सायकल केले जाते.
या नोटांनी पुन्हा पेपर प्रॉडक्ट बनवले जातात. नंतर हे प्रॉडक्ट बाजारात विकले जातात.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ST Workers Agitation | ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : RBI Rules | rbi rules if any bank refuses to exchange torn currency notes then action can be taken know everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update