200, 2000 रुपयांच्या खराब नोटा बदलता येणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नोटांबदी लागू झाल्यानंतर आरबीआयकडून २०० रुपये आणि २०००  रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या मात्र यासंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जर तुमच्याकडेही २०० आणि २००० रुपयांच्या नोटा आहेत तर तुमचे कदाचित नुकसान होऊ शकते. रिझर्व्ह बँक इंडियाने याबाबत मोठी घोषणा केलीये. २०० आणि २००० रुपयांच्या नोटा आता बँकांमध्ये बदलल्या जाणार नाहीये. आरबीआयकडून चलनात आलेल्या २०० आणि २००० रुपयांच्या नोटा काही कारणामुळे खराब झाल्या तर त्या बँकेत बदलता येणार नाही. तसेच या नोटा बँकेत जमाही करता येणार नाही. कारण आरबीआयने नोटांच्या अदलाबदलीच्या नियमांतर्गत या नोटांना ग्राह्य धरलेले नाही.

चलनातील नोटांच्या देवाणघेवाणांसंबधीच्या नियमावलीत या नवीन नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यामुळे फाटलेल्या, खराब अवस्थेत असलेल्या २०० आणि २००० रुपयांचा नोटा तुमच्याकडे असतील त्या बदलता येणार नाही. फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा बदलणे, जमा करण्याचा प्रकार आरबीआय नियमांतर्गंत येतो. हा नियम आरबीआय कायद्याच्या कलम २८ चा एक भाग आहे. या कायद्यामध्ये ५, १०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र २०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा यात उल्लेखच नाही. याचे कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयने या नोटांच्या आदान-प्रदान लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केलेले नाहीत. यामुळे २०० आणि २००० नोटा फाटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या बँकांमध्ये जमा करता येणार नाहीयेत शिवाय बदलता देखील येणार नाही येत.