बँक खात्यातील तुमचे पैसे आधिक ‘सुरक्षित’ करण्यासाठी ‘RBI’ आणणार नवे ‘नियम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएमने ट्रांजेक्शन करणे आणखी सुरक्षित होणार आहे. एटीएम फ्रॉडच्या वाढत्या कारणाने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरबीआय लवकरच मार्गदर्शक तत्व जारी करण्यात येतील. आरबीआयने गुरुवारी सांगितले की एटीएम सर्विस प्रोवायडरसाठी लवकरच नवी मार्गदर्शक तत्वे लागू होतील. आरबीआयने सांगितले की या संबंधित 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल.

आरबीआयने काय सांगितले –
आरबीआयने सांगितले की काही कमर्शिअल बँक, शहरी सहकारी बँक एटीएम स्विच अॅप्लिकेशनशी संबंधित सुविधेसाठी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोवायडर्सवर अवलंबून आहे. या सर्व्हिस प्रोवायडरकडे पेमेंट सिस्टम पारदर्शक करण्यात यावी. यात सायबर हल्ल्याची शक्यता वाढली आहे. आता हा निर्णय घेण्यात आला आहे. काही बेसलाइन सायबर सिक्योरिटी कंट्रोल्स विनियमित संस्थांद्वारे सर्व्हिस  प्रोवायडर्सबरोबर करार अनिवार्य करावे.

उचलणार ही पावले –
आरबीआयने सांगितले की, नव्या मार्गदर्शक तत्वात डिप्लॉयमेंट प्रोसेसला मजबूत करणे आणि इकोसिस्टमला अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे आवश्यक आहे. याशिवाय पडताळणी, स्टोरेजमध्ये कंट्रोल लागू करणे, सेंसेटिव्ह डेटा प्रोसेसिंग आणि ट्रांसमिशन, फॉरेंसिग तपासासाठी क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे.

आरबीआय एटीएम क्लोनिंग, फिशिंगच्या घटना वाढल्याने बँकांकडून आपल्या एटीएम संबंधित सुरक्षा उपायांना आणखी सुरक्षित बनवण्यास सांगितले आहे. आरबीआयने सांगितले की या संबंधित 31 डिसेंबर 2019 पर्यंत मार्गदर्शक तत्व लागू करण्यात येईल.