…म्हणून आगामी 9 महिन्यात बँकेतील NPA वाढणार, RBI चा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थव्यवस्थेतील दीर्घकालीन मंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सावधानतेचा इशारा दिला आहे की, पुढील नऊ महिन्यांत बँकांत अडकलेल्या कर्जात (NPA) आणखी वाढू होऊ शकते. अर्थव्यवस्थेतील मंदी, कर्ज न भरणे आणि क्रेडिट ग्रोथमध्ये घट हे त्याचे कारण असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. जून आणि डिसेंबरमध्ये वर्षातून दोनदा प्रकाशित होणार्‍या आरबीआयच्या वित्तीय स्थिरता अहवालात (FSR) मध्यम रेटिंग कंपन्यांनी रेटिंग शॉपिंगवर लक्ष वेधले आहे.

क्रेडिट ग्रोथचा दर :
आरबीआयने म्हटले आहे की, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे सध्या रोख रकमेची कमतरता नाही, यामुळे त्यांना कर्जाची गरज भासणार नाही, ही सद्य परिस्थितीत क्रेडिट ग्रोथ कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची क्रेडिट ग्रोथ सप्टेंबर २०१९ पर्यंत ८. ७ टक्के पर्यंत खाली आली आहे, त्या तुलनेत खाजगी बँकांची १६.५ टक्के वाढ झाली आहे.

सीएआरमध्ये वाढ :
आरबीआयने इशारा दिला की, सरकारने सरकारी बॅंकांच्या पुनर्पूंजीकरणानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये बँकांचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १५.१% पर्यंत वाढले आहे. प्रोविजन कवरिंग रेशियो (PCR) देखील मागील वर्षातील ६१. ५ टक्क्यांवरून ६०. ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आरबीआयने सांगितले कि, “मुख्यत: आर्थिक परिस्थिती, कर्जाची देयके अपयशी ठरल्यामुळे तसेच क्रेडिट ग्रोथच्या घसरणीमुळे सप्टेंबर २०१९ मध्ये बँकांचे ग्रॉस एनपीए (GNPA) प्रमाण ९.३ टक्केवरून सप्टेंबर २०२० मध्ये ९.९ टक्के वर पोहचू शकेल.

PSB चे रखडलेले कर्ज :
अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण कर्ज सप्टेंबर २०१९ मधील १२. ७ टक्क्यांवरून सप्टेंबर २०२० मध्ये १३.२ टक्के पर्यंत जाईल. त्याचबरोबर खासगी बँकांसाठी हा आकडा ३.९ टक्यांवरून वरून ४.२ टक्क्यांपर्यंत जाईल. दुसरीकडे, विदेशी बँकांसाठी ही आकडेवारी २.९ टक्क्यांवरून ३. १ टक्क्यांपर्यंत जाईल. वाढीव तरतूदीमुळे सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय बँकांचा निव्वळ एनपीए घटून ३.७ टक्के झाल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/