‘हे’ ॲप डिलिट करा, नाहीतर तुमचे बँक अकाउंट होईल हॅक : आरबीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्वाचा अलर्ट जरी केला आहे. आरबीआयने AnyDesk मोबाइल ॲप डाउनलोड करू नये किंवा ते इन्स्टॉल केलं असेल, तर त्याने ते त्वरित अनइन्स्टॉल करावं अशी सूचना ग्राहकांना दिली आहे. या ॲपद्वारे हॅकिंग होऊन तुमच्या खात्यातून रक्कम काढली जाऊ शकते. AnyDesk हे मोबाइल ॲप हॅकर्ससाठी एखाद्या रिमोट कंट्रोल प्रमाणे काम करते. त्याचा उपयोग अनेक डिव्हाइस एकमेकांशी जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. हे ॲप डाउनलोड केल्यांनतर ते आपल्याकडे काही गोष्टींसाठी परवानगी मागते. सायबर चोर आता या ॲपच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यातील पैसे लंपास करत आहेत. अशाप्रकारे अनेक ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे.

आरबीआयच्या सिक्युरिटी आणि आयटी एक्झामिनेशन सेलने याबाबत सूचना जारी केली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या AnyDesk ॲप्सची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातदेखील केली जाते.

अशा प्रकारे चोरी केली जाते –

सायबर गुन्हेगारांनी लोकांच्या बँक खात्यामधील पैसे चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. फोनमध्ये AnyDesk हे ॲप डाउनलोड केल्यांनतर इन्स्टॉल झाल्यास इतर ॲप तसेच इन्फॉर्मशन चे ऍक्सेस मागते. ही परवानगी मिळाल्यांनतर हे ॲप फोनमध्ये असलेल्या पेमेंटची माहिती , आयडी आणि पासवर्ड रेकॉर्ड करते. यूझरच्या डिव्हाइसवर ९ अंकांचे App कोड जनरेट करते. सायबर हॅकर्स कॉल करून हाच कोड बँकेच्या नावावर मागतात. त्याद्वारे हे चोर बँक खात्यातले पैसे लुटतात.