आरबीआय (RBI) करु शकते ‘रेपो’ (REPO) रेटच्या व्याजदरात कपात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय रिजर्व बँक (आरबीआय) व्याजात कपात करण्याची शक्यता आहे. ज्यात कमी मागणी, उत्पादनातील कमतरता आणि मंदावलेला रोजगार अशी कारणे आहेत. आर्थिक वृद्धी दरात पुन्हा तेजी आणण्यासाठी आरबीआय व्याजदरात कपात करु शकते असा अंदाज आहे. रेपो रेट मध्ये 0.25 ने कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाद्य पदार्थांमधील कमी किंमती, तसेच वृद्धीचा विचार करता आरबीआय व्याजदरात कपात करु शकते.

ऑल इंडिया रेटींग अँन्ड रिसर्च निर्देशक आणि अर्थतज्ञ सुनील कुमार सिन्हा यांनी आईएएनएसच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मंदावलेल्या विकास दारामुळे आरबीआयला व्याजदरात कपात करण्याची संधी मिळाली आहे. तसेच मान्सूनचा आणि कच्च्या तेलाच्या किंमतीचा देखील कपातीवर परिणाम होऊ शकतो.रेपो

स्टेट बँक समूहाचे मुख्य अर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांच्या मते रेट मध्ये कपात करताना आर्थिक परिस्थितीचा विचार करावा जेणेकरून अर्थव्यवस्थेला सहाय्य मिळेल. एडीलविस सिक्युरिटी मुख्य अर्थतज्ञ माधवी अरोडा यांच्या मते त्यांनी जूनमध्ये 0.25 ने रेट कपात होईल असे गृहित धरले होते, परंतु यानंतर पुढील बैठकीत अजून 0.25 ने रेटमध्ये कपात होऊ शकते असे त्यांनी सांगितले आहे.