लवकरच नवीन 100 रूपयाची नोट बाजारात आणणार RBI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नवीन शंभर रुपयांची नोट जारी करणार आहे. या नवीन नोटांवर वार्निशची झळाळी देण्यात येणार आहे. यामुळे या नोटांचे आयुर्मान देखील वाढणार असून सध्या या नोटा ट्रायल म्हणून छापण्यात येणार आहेत.

जगभरातील अनेक देशांत या नोटांचा वापर –

जगात अनेक देश अशा प्रकारच्या नोटांचा वापर करत असून यामुळे नोटांचे आयुर्मान वाढले आहे. इतर देशांच्या चांगल्या अनुभवामुळेच भारताने देखील याचा वापर करण्याचे ठरवले आहे. भारतात 100 रुपयांपासून याची सुरुवात होणार असून जर हा प्रयोग यशस्वी झाला तर सर्व नोटांना याची झळाळी देण्यात येणार आहे. प्रत्येक 5 नोटांमधील एक नोट दरवर्षी खराब होत असल्याने आरबीआयला याच्या छपाईसाठी मोठा खर्च करावा लागतो.

काय आहे वार्निश –

आपल्या घरात असलेल्या फर्निचरवर आपण एक चमक पाहत असतो. हि चमक याच वार्निश नावाच्या पदार्थामुळे येत असते. यामुळे फर्निचरचे आयुष्य देखील वाढते. त्यामुळेच नोटांवर देखील याचा एका थर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे नोटांचे देखील आयुष्य वाढणार आहे. मात्र या सगळ्यामुळे नोटा छपाईच्या किमतींमध्ये देखील वाढ होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –