EMI पेमेंट करू शकत असाल तर RBI ‘मोरेटोरियम’चा लाभ घेऊ नका, मोठया बचतीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू (COVID-19) मुळे किरकोळ कर्ज (Retail Loan) घेणाऱ्या ग्राहकांमध्ये वेळेवर रिपेमेंटच्या बाबतीत बरेच प्रश्न आहेत. शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्यांना रिझर्व्ह बॅंकद्वारा नीतिगत व्याज दरात कपात आणि 3 महिन्यांचे मोरेटोरियम दिल्याने नक्कीच या संकटाच्या काळात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

एसबीआय ग्राहकांना देणार पूर्ण लाभ

स्टेट बँक ऑफ इंडियानेही आरबीआयच्या घोषणेनंतर सांगितले की ते ग्राहकांना रेपो लिंक्ड होम लोनमध्ये 0.75 टक्क्यांचा पूर्ण लाभ देईल. या निर्णयामुळे 30 वर्षाच्या गृह कर्जात प्रति लाख 52 रुपयांची बचत होईल, असे एसबीआयने म्हटले आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या ग्राहकाने एसबीआयकडून रेपो लिंक्ड तत्वावर कर्ज घेतले असेल तर त्यांचा ईएमआय कमी होईल.

1 ऑक्टोबर 2019 नंतर सर्व बँकांनी जारी केलेल्या किरकोळ कर्जाचा संबंध बाह्य बेंचमार्कशी जोडला जाईल. अशा परिस्थितीत आरबीआयच्या घोषणेनंतर बँका आपल्या ग्राहकांना त्याचा लाभ देतील. असे झाल्यास, कर्ज घेणार्‍या लोकांचा ईएमआय कमी होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर आपण आपल्या गृह कर्जाची परतफेड करणे चालू ठेवले आणि आरबीआयच्या मोरेटोरियम कालावधीचा फायदा न घेतल्यास आपल्याला त्याहूनही अधिक फायदा होऊ शकेल.

नीतिगत व्याज दर कपातीपासून सर्व प्रकारच्या टर्म लोन मध्ये सवलत

मनीकंट्रोलने आपल्या एका अहवालात तज्ञाचा हवाला देत लिहिले की आरबीआयच्या मोरेटोरियमच्या निर्णयाने व्याजदरातील कपातीच्या तुलनेने अधिक लक्ष वेधले आहे. तर, कोणत्याही प्रकारचे मुदत कर्ज घेणार्‍या ग्राहकांना नीतिगत व्याज दराच्या कपातीचा फायदा होईल. यात घर, वाहन, वैयक्तिक आणि शैक्षणिक पासून क्रेडिट कार्डची थकबाकी देखील समाविष्ट आहे. जर आपण आपला ईएमआय (EMI) भरण्यास सक्षम असाल आणि मोरेटोरियम कालावधी (Moratorium Period) चा फायदा घेत नाहीत तर आपल्याला अधिक फायदे कसे मिळतील हे जाणून घेणे आता महत्वाचे आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मोरेटोरियम म्हणजे याचा फायदा घेणार्‍या ग्राहकांच्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही 3 महिन्यांसाठी वाढविण्यात येईल. याचा फायदा असा आहे की सध्या व्याज दर कमी आहेत आणि तुम्हाला अशी संधी आहे की या कमी व्याजदराच्या काळात तुम्ही ठरलेल्या वेळेपूर्वी कर्ज परतफेड करू शकता.

मोरेटोरियमचा फायदा घेतला नाही तर आपल्याला काय फायदा होईल

मॉर्टगेजवर्ल्ड या कर्जाच्या सल्लागार कंपनीच्या हिशोबानुसार जर एखाद्याने 45 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, ज्याची 300 महिन्यांत परतफेड करायची आहे आणि त्याने मोरेटोरियम कालावधीचा लाभ घेतला असेल तर सध्याच्या व्याजदराच्या आधारे संपूर्ण कालावधीसाठी त्याच्याकडे 11.59 लाख रुपयांच्या व्याजाची बचत होईल. यासाठी त्याला दरमहा 34,731 रुपये ईएमआय भरावा लागेल. तथापि, जर या व्यक्तीने या 3 महिन्यांत त्याच्या मोरेटोरियम कालावधीचा फायदा घेतला नाही, तर त्याची एकूण बचतीची रक्कम 15.39 लाख रुपये इतकी असेल. अशा परिस्थितीत, जर आपण सध्याच्या काळात ईएमआय जमा करण्यास सक्षम असाल आणि आपण मोरेटोरियम कालावधीचा लाभ घेतला नाही तर आपल्याला फायदा होऊ शकेल.

केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे की या तीन महिन्यांत कर्जावरील व्याज मोजले जाईल. मोरेटोरियम म्हणजे व्याजातून मुक्तता दर्शविणे असे नाही. याचा अर्थ असा आहे की आपण सक्षम नसल्यास या 3 महिन्यांत ईएमआय जमा करण्याबाबत आपल्याला दिलासा मिळेल. त्याऐवजी, तुमच्या एकूण कर्ज परतफेड कालावधीत 3 महिन्यांनी वाढ केली जाईल