RCFL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत ही बातमी तरुणांसाठी दिलासादायक आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेडने (RCFL) ऑपरेटर ग्रेड (केमिकल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदाच्या भरतीबाबत अधिसूचना जारी केली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2021 आहे. केली आहे. त्यानुसार इच्छुक अन् पात्र उमेदवारांना आरसीएफएलच्या (RCFL)  www.rcfld.com या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करता येणार आहे. 50 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

ऑपरेटर ग्रेड (केमिकल) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. एस्ससी ही पदवी उत्तीर्ण असावा.
तसेच उमेदवाराचे वय 36 वर्षांपेक्षा अधिक नसावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी (OBC) वर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी (SC) आणि एसटी (ST) वर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली आहे.
तसेच खुला गट आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांकरिता अर्ज शुल्क 700 रुपये आहे.
एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांकरिता कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी, असे आवाहन केले आहे

महत्वाच्या तारखा

1) ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात – 7 जून 2021

2) ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत – 21 जून 2021

अधिकृत वेबसाइट – (RCFL)  www.rcfltd.com

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण