HomeराजकीयJDU मध्ये मोठा बदल, नितीशकुमार यांच्याऐवजी आरसीपी सिंग बनले नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

JDU मध्ये मोठा बदल, नितीशकुमार यांच्याऐवजी आरसीपी सिंग बनले नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरसीपी सिंग यांची जनता दल युनायटेड (जेडीयू) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नितीशकुमार म्हणाले की, दोन पदे एकाचवेळी हाताळणे सोपे नाही. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष दोन्ही भूमिका एकत्र सांभाळने सोपे नव्हते. नितीशकुमार यांनी आरसीपी सिंग यांचे नाव प्रस्तावित केले आणि त्यानंतर इतर सदस्यांनी त्याला पाठिंबा दर्शविला.

आरसीपी सिंग हे नितीशकुमार यांचे अगदी जवळचे मानले जातात. बिहार निवडणुकीच्या वेळी नितीशकुमार अनेक विषयांवर त्यांचा सल्ला घेत असत. नितीशकुमार यांनी यापूर्वीही बर्‍याच वेळा आरसीपी सिंग यांना पक्षाचे नेतृत्व देण्याविषयी बोलले होते.

कोण आहेत आरसीपी सिंग ?
आरसीपी सिंग यांचे पूर्ण नाव रामचंद्र प्रसाद सिंह. ते बिहारमधील जेडीयू कोट्यातून राज्यसभेचे खासदार आहेत. नितीश यांच्या जिल्हा नालंदा येथे राहणारे आरसीपी सिंह पूर्वी युपी संवर्गातील आयएएस अधिकारी होते आणि नितीश सरकारमध्ये प्रधान सचिव होता.

62 वर्षीय आरसीपी सिंह हे अवधिया कुर्मी जातीचे आहेत. नितीश हे नालंदा जिल्ह्यातील मुस्तफापूर येथील रहिवासी आहे. नागरी सेवेच्या काळात आर.सी.पी. सिंह यांनी यूपी सरकारमधील अनेक महत्त्वाच्या विभागांत काम केले. ते नितीश कुमार यांचे खास मानले जातात. ते पहिले प्रधान सचिव म्हणून बिहारमधील नितीश सरकारशी संबंधित होते. त्यानंतर राजकारणात आले आणि आता ते जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत.

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या वेळी सीएम नितीशकुमार आरसीपी सिंगवर जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीबाबत सर्वाधिक विश्वास ठेवत असत. आरसीपी सिंग हे गेल्या दोन वेळा राज्यसभेचे सदस्य आहेत. 2010 मध्ये ते प्रथम राज्यसभेत गेले आणि त्यानंतर 2019 मध्ये नितीशकुमार यांनी त्यांना पुन्हा पाठवले.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News