राजगडाजवळ ब्रेक फेलमुळे पोलिसांच्या बसला अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – किल्ले राजगडावर बंदोबस्तसाठी जात असताना उतारावर ब्रेक निकामी झाल्याने बारामती आरसीपी (रायट कंट्रोल पोलीस) बसला बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. या घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले असल्याची वेल्हे पोलिसांनी दिली.

बारामती आरसीपी (रायट कंट्रोल पोलीस) चे पथक बुधवारी दुपारी राजगडावर बंदोबस्तासाठी नेमले होते. पंधरा ते सोळा कर्मचारी या आरसीपी बसमध्ये होते. त्यांना  मार्गे राजगडाकडे त्यांची बस जात असताना तेथून ते पाल गावाकडे येत होते. त्यावेळी उतारावर बसचे ब्रेक निकामी झाले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  यात चार कर्मचारी जखमी झाले. याच कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून वेल्हे पोलिसांना माहिती देण्यात आली. वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना नसरापुर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करून सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले