‘लॉकडाऊन’मध्ये मनोरंजनासाठी प्रसिद्ध मालिका ‘महाभारत’चं पुन: प्रसारण ! जाणून घ्या कधी अन् कुठं


पोलीसनामा ऑनलाईन :
सध्या देशात सुरू असाऱ्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा महाभारत या मालिकेचं प्रसारण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आधीच रामायण मालिकेच्या प्रसारणाचाी घोषणा केली आहे. आता त्यांनी पुन्हा अनाऊंसमेंट केली आहे की, 80 च्या दशकात आलेली मालिका महाभारत पुन्हा प्रसारीत केली जाणार आहे. जेव्हा मालिका टीव्हीवर दाखवल्या जायच्या लोक हातातील काम सोडून टीव्ही समोर येऊन बसत असत.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत सांगितलं की, “हे सांगताना खूप आनंद होत आहे की, 28 मार्च 2020 पासून दरोरज महाभारत ही मालिका दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता डीडी भारतीवर रोज प्रसारीत केली जाणार आहे.”

80 च्या दशकात आलेली ही मालिका बीर आर चोपडांनी तयार केली होती. महाभारत पाहण्यासाठी अक्षरश: मोठ मोठ्या रांगा लागत असत. कालच प्रकाश जावेडकरांनी रामायणबद्दलही घोषणा केली होती. प्रकाश जावडेकरांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “जनतेच्या मागणीनंतर आता शनिवार दि 28 मार्च 2020 पासून रामायणचं पुन: प्रसारण दूरदर्शनवर केलं जाणार आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड सकाळी 9 वाजता आणि दुसरा एपिसोड रात्री 9 वाजता प्रसारीत केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती की, दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा सुरू केल्या जाणार आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशलवरून तशी मागणीही केली होती. या सगळ्यानंतर आता सरकारनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 90 च्या दशकाती किड्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे याबद्द काही शंकाच नाही. चाहत्यांमध्ये या बातमीमुळं आता आनंदची लाट पसरताना दिसत आहे.