Re – registration of vehicles | एक एप्रिलपासून बदलणार आहेत नियम, जुन्या कारचा तुमच्या खिशावर पडणार 7 पट जास्त भार; जाणून घ्या कसा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Re – registration of vehicles | 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी (Re – registration of vehicles) महाग (costly) होणार आहे. दशकाहून जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण (renewing the registration) करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटीने वाढणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सर्व 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी सध्याच्या 600 रुपयांऐवजी 5,000 रुपये खर्च येईल.

 

दुचाकीसाठी ग्राहकाला 300 रुपयांऐवजी 1000 रुपये मोजावे लागतील. तर आयात केलेल्या कारसाठी 15,000 रुपयांऐवजी 40,000 रुपये मोजावे लागतील. याशिवाय, खाजगी वाहनांची पुनर्नोंदणी करण्यास विलंब झाल्यास दरमहा 3000 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. व्यावसायिक वाहनांसाठी दरमहा 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

 

जुन्या वाहनांचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण
नवीन नियमांनुसार, 15 वर्षांपेक्षा जुन्या प्रत्येक खासगी वाहनाला दर पाच वर्षांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागणार आहे.
मात्र, राष्ट्रीय राजधानी दिल्लीला या नियमातून सूट देण्यात आली आहे.
कारण शहरात पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने अनुक्रमे 15 आणि 10 वर्षांनंतर अनोंदणीकृत मानली जातात. (Re – registration of vehicles)

फिटनेस टेस्टचा खर्चही वाढणार
याशिवाय जुनी ट्रान्सपोर्ट आणि कमर्शियल वाहनांच्या फिटनेस चाचणीचा खर्चही एप्रिलपासून वाढणार आहे.
परिवहन मंत्रालयाच्या सुधारित दरांनुसार, फिटनेस चाचणीसाठी 1 एप्रिलपासून टॅक्सींसाठी 1,000 रुपयांऐवजी 7,000 रुपये लागणार आहेत.
बस आणि ट्रकसाठी 1,500 ऐवजी 12,500 रुपये लागतील. याशिवाय आठ वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असेल.

केंद्र सरकारने अनुपालन शुल्क (compliance fee) वाढवले आहे जेणेकरुन मालक जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा पर्याय निवडतील आणि जास्त प्रदूषण होणार नाही.
भारतातील एक कोटीहून अधिक वाहने स्क्रॅपिंग (vehicles scrapping) साठी पात्र आहेत.
कार मालकांना जुनी वाहने स्क्रॅप करणे सोपे व्हावे यासाठी केंद्राने प्रक्रिया ऑनलाइन केली आहे.

 

Web Title :- Re-registration of vehicles | rules are going to change from april 1 old cars will be very heavy on your pocket understand how

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा