मुंबईतील ‘नाईट लाईफ’वर अमृता फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई नाईट लाईफवर माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. 27 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईतील अनिवासी जागांमध्ये हॉटेल्स, मॉल्स, दुकानं 24 तास सुरु राहणार आहेत. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देखील देण्यात आली.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत कधीही बंद नसते. मुंबईत रात्रदिवस अनेक येत जात असतात. त्यामुळे त्यांची सुविधा व्हावी आणि महसूलात भर पडावी अशी आदित्य ठाकरेंची आग्रही भूमिका आहे.

यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये महिला रात्रंदिवस काम करतात. मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. अशात मुंबईतील नाईट लाईफच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कशी दिली जाणार आहे याचा विचार केला जावा. मुंबईत सुरु झालेल्या नाईट लाईफ सारखं नाईट लाईफ ईथर शहरांमध्ये देखील सुरु व्हावं. इतर शहरांनी याचे अनुकरण करावे असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

यावेळी मनसेची नवी भूमिका, शरद पवार यांची दिल्लीत हटवण्यात आलेली सुरक्षा आणि भाजप सरकारच्या काळात कथित फोन टॅपिंगचे प्रकरण या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

फेसबुक पेज लाईक करा –