जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, शिवसेना म्हणते….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका मुलाखतीत जयंत पाटील यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे बोलून मनांतील इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठींबा दिला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे.

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पदाची आशा बाळगणे हे प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे काम असते. मात्र, पाटील कोणत्या सालाबद्दल बोलत आहेत, हे त्यांना विचारावे असा टोला त्यांनी लगावला. पुण्या ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपाददकत्वाखालील ‘प्रोबधन’ पाक्षिकाच्या शतकमोत्सवानिमित्त संवाद पुणे तर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या शैलीत जोरदार टोला लगावला.

काय म्हणाले होते जयंत पाटील ?
इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेस वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असे स्पष्ट विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता जयंत पाटील हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानलं जात आहे.