जूनचे विजबिल भरण्यासाठी ‘महावितरण’नं दिली ‘अशी’ सवलत, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस संकटामुळे वीज बिल उशीरा भरण्याची सवलत मिळाली होती. मात्र, या काळातील बिले जास्त आल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. याची दखल घेत सरकारच्या निर्देशानंतर महावितरणने तीन महिन्याचे वीजबिल एकरकमी भरणार्‍या वीज ग्राहकांना वीजबिलात दोन टक्के सवलत तर मागणी करणार्‍या ग्राहकांना वीजबिलाचे तीन समान हप्ते करून देण्याची सवलत दिली आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे आणि वीजबिल वितरण न करण्याचे आदेश वीज नियामक आयोगाने दिले होते. यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीज वापराची बिले देण्यात आली. ही वीजबिले असंख्या ग्राहकांना अव्वाच्या सव्वा आल्याने स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन यासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. आता 1 जूनपासून शासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात सूचनांचे पालन करुन मिटर रीडींग, वीजबिले वाटप तसेच वीजबिले संकलन केंद्रे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. आता जून महिन्याची बिले वाटप केली आहेत.

वाढीव वीजबिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातूनही ग्राहकांचे समाधान न झाल्यास ईमेल आयडी शपशीसूाळपळीींशीऽारहरवळीलेा.ळप व मोबईल (9833567777) व (9833717777) यावरून तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे.

तसेच घरगुती ग्राहकांसाठी तीन हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. ही सवलत घेण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन कमीत कमी वीजबिलाच्या एक तृतीयांश रक्कम भरता येईल. संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास 2 टक्क्यांची सूट मिळणार आहे.

ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेचे वीजबिल भरले आहे, त्यांनाही ही सूट पुढील बिलामध्ये मिळणार आहे. जे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमुळे मूळगावी गेल्यामुळे त्यांचा वीजवापर कमी झाला आहे, त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरूस्त करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like