‘गुगल डुडल’ – ‘विंटर सोलस्टाइस’ हे आहे आजच्या दिवसाचे महत्व

वृत्तसंस्था – गुगल नेहमी ‘गूगल डुडल’ च्या माध्यमातून व्यक्ती किंवा त्या दिवसाची खासियत प्रमाणे आपल्या डुडल वरून व्यक्तीच्या कार्याला मानवंदना देते किंवा प्रत्येक देशातील काही वेगळं शोधून किंवा आणखी काही त्यानुसार संशोधन करुन हे डुडल बनवले जाते. तेसच आजच्या दिवसाचे महत्व सांगणारे डुडल गुगलने बनवले आहे.

हे आहे आजच्या दिवसाचे  महत्व
आजचा दिवस म्हणजेच २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. गुगलने याबाबत डुडलही बनवलं आहे. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी २१ डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतोआणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतो. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होतो . २१ डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते.

आजच्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. २५ डिसेंबर पासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेने   तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते.

विंटर सोलस्टाइस जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चीनमध्ये आजचा दिवस पॉझिटीव्ह एनर्जी चा दिवस समजला जातो. चीन बरोबरच तैवानमध्ये या दिवशी लोक पारंपरिक अन्नाला प्राधान्य देतात. पाकिस्तानमधील नॉर्थ वेस्टर्न भागातील आदिवासी जमाती या दिवशी उत्सव साजरा करतात. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील काही भागात आजच्या दिवशी द फिस्ट ऑप जूल फेस्टिव्हल साजरा केला जातो.