#पावसातलासह्याद्री शरद पवार पुस्तकावर वाचकांच्या उड्या ! पहिली आवृत्ती हातोहात संपली, लवकरच दुसरी आवृत्ती बाजारात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्राच्या राजकारणातील खासदार शरद पवार हे नाव म्हणजे मैलाचा दगड. त्यांना वगळून राज्याच्या राजकारणाकडे पाहणे, अभ्यास करणे शक्यच नाही, म्हटले तर अतिशयोक्ती वाटू नये. असेच हे व्यक्तिमत्व आहे. याच व्यक्तीमत्वाच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणावर मोहोर उमटविली आणि तत्कालीन भाजपची सत्ता उलथवून टाकत पवार हेच ‘पॉवर’ असल्याचे सिद्ध करून दाखवले. त्याच पावसातल्या सभेवर आधारीत ‘#पावसातलासह्याद्री शरद पवार’(Pawasatala Sahyadri Sharad Pawar) हे पुस्तक सध्या महाराष्ट्रातच नाही, तर देशभर आणि परदेशातही अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. जगभरातून या पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडत असून पहिली आवृत्ती हातोहात खपली देखील आहे.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या काळातच लागली होती.
या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात शरद पवार यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत नेमकं भाषणादरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला.
तरीही सभा न थांबवता किंवा आटोपती न घेता शरद पवार जनतेशी संवाद साधत राहिले.
ती सभा ऐकायला आलेले लोक देखील धुवाधार पावसात पवार यांना ऐकत होते.
त्या सभेने अक्षरशः इतिहास घडविला.
महाराष्ट्राचे राजकारण ३६० अंशात फिरले.

प्रत्यक्ष सभा चालू असतानाच आणि त्यानंतर पुढील कितीतरी दिवस या पावसातल्या सभेचे सोशल माध्यमांत अभूतपूर्व प्रतिबिंब उमटत राहिले.
स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य माणसापासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि मान्यवर विचारवंत पत्रकारांपासून राजकीय विश्लेषक आणि दिग्गज नेत्यांपर्यंत हजारो लाखो जाणकारांनी वेगवेगळ्या शब्दात आपापल्या अकलनानुसार या सभेबाबत मत व्यक्त केले होते.
सोशल माध्यमांत कितीतरी दिवस शरद पवार आणि त्यांची पावसातली सभा हा एकच विषय ट्रेंडवर होता.
साहजिकच पावसात भिजणारे पवार हे त्यांच्या व्यक्तिचित्रणातून यापुढील काळात वेगळे काढता येणार नाहीत यावर शिक्कामोर्तब करणारी ती सभा ठरली.

त्याच पावसातल्या सभेनंतर सोशल माध्यमांत उमटलेल्या प्रतिसादाचे दस्तावेजीकरण सोलापूर येथील पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी केले आहे.
याला ज्येष्ठ पत्रकार गिरीश लता पंढरीनाथ यांनी सहसंपादनाची साथ दिली; आणि एक देखणे तितकेच वाचनीय पुस्तक तयार झाले आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
स्टर्लिंग सिस्टिम्सचे सतिश पवार यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून ते विक्रीसाठी

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
ॲमेझॉन किंडलवर तर जगभरातून या पुस्तकाला मागणी असून एकूण १३ देशातील ॲमेझॉन पेज वर या किंडल आवृत्तीचे प्रकाशन झाले आहे.
त्यात भारतासह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, ब्राझील, न्यूझीलंड, मेक्सिको, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आदी देशांचा समावेश आहे.पुस्तकाला मिळणारा हा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता लवकरच दुसरी आवृत्ती बाजारात आणणार असल्याचे सतिश पवार यांनी सांगितले.

आता दुकानांतही उपलब्ध

कोरोना साथीमुळे गेले काही महिने महाराष्ट्रात आणि एकूणच देशभरात अंशतः लॉकडाऊन सुरू आहे.
जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने आणि बाजारपेठा बंद आहेत.
तर काही ठिकाणी नुकताच १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.
पुस्तक विक्रीची दुकानं दुपारपर्यंत उघडण्यास मुभा मिळाली आहे.
त्यामुळे आतापर्यंत अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध असलेले
‘#पावसातलासह्याद्री शरद पवार’ (Pawasatala Sahyadri Sharad Pawar) हे पुस्तक आता संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांना आपल्या जवळच्या दुकानांतही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सतिश पवार यांनी सांगितले.

RBI ने बँकांसाठी बदलले नियम ! सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटसाठी जारी केला नवीन आदेश