देशातील ‘मशिदी’ व ‘चर्च’मधील सोन्याबद्दल बोलण्याची हिंमत पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. उद्योगधंदे, नोकरदार, मजूर वर्गाला दिलासा देण्यासाठी आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांची घोषणा ही समाधानाची बाब आहे. तसेच केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यांच्या या सूचनेला शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी विरोध केला आहे.

शिर्डी देवस्थान हे देशातील तीसऱ्या क्रमांकाचे देवस्थान मानले जाते. या देवस्थानाकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिले आहे. शिर्डी संस्थानचे वार्षिक उत्पन्न 700 कोटी असून विविध प्रकारचा वार्षिक खर्च 600 कोटी रुपये एवढा आहे. लॉकडाऊनमुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय स्वरुपात घट झाली आहे. मात्र, तरीही संस्थानने एफडी मोडून कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राला केलेल्या सुचनेवर प्रतिक्रिया देताना शिर्डी संस्थानचे प्रमुख डॉ. हावरे यांनी चव्हाण यांना प्रश्न विचारला आहे. देशातील सर्व मशिदीं व चर्चेस मध्ये पडून असलेले सोने सरकारने ताबडतोब ताब्यात घ्याव, असे म्हणण्याची हिंमत मा. पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय ? मंदीरांबद्दल बोलणे फार सोपे आहे साहेब..! असे ट्विट हावरे यांनी केले आहे. चव्हाण यांच्या वक्तव्यावर संतप्त झालेले संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी मंदीराबाबत बोलणे सोपे आहे, देशातील मिशिदी व चर्चेसमध्ये पडून असलेले सोने सरकारने ताबडतोब ताब्यात घ्यावे असे म्हणण्याची हिंमत चव्हाण करतील का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

चव्हाण यांचे हे राजकीय स्टंट
चव्हाण यांचे हे राजकीय स्टेटमेंट आहे त्यांना खरेच तसे वाटत असते तर त्यांनी राज्य व केंद्र सरकारशी चर्चा केली असती. तसेच त्यांनी ताबडतोब सोने ताब्यात घ्या असे वापरले आहेत, हे शब्द आरेरावीची वाटतात तसेच त्यातुन त्यांची ही आपल्या मलकीची प्रॉपर्टी असल्याच वास येतो. त्यांनी सुचना किंवा विनंती केली असती तर समजू शकलो असतो. मात्र, हे सोने बेवारस नाही तर भक्तांची प्रॉपर्टी आहे. ताबडतोब ताब्यात घ्या असे शब्द ते मशिद किंवा चर्चेस बाबतीत वापरू शकले असते का ? त्यांचा हा केवळ राजकिय स्टंट आहे, यातुन हिंदु देवस्थानने व मंदिरांचा एकप्रकारे अवमान झाला आहे.