रेडी आहे तब्बल 7 कोटींचा सेट ! ‘लॉकडाऊन’मुळं अजय देवगणच्या ‘या’ सिनेमाचं मोठं नुकसान होणार

पोलिसनामा ऑनलाइन –देशात अचानाक लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनचा साऱ्यांनाच फटका बसत आहे. फिल्म इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. इंडस्ट्रीतील लोकांचा यामुळं आधीच मोठं नुकसान झालं आहे. अशात त्यांना आणखी नुकसान सहन करावं लागणार आहे असं दिसतंय. अजय देवगणचा सिनेमा मैदानचीही अशीच काहीशी स्थिती आहे. लॉकडाऊनमुळं आता मेकर्सला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, मैदान सिनेमाची शुटींग आधी दिमाखात सुरू होती. यातील फुटबॉल मॅचच्या शुटींगसाठी 7 कोटींचा सेटही अभारण्यात आला होता. परंतु जसा सेट तयार करण्यात आला तशी लॉकडाऊनची घोषणा झाली. मेकर्स यासाठी तयार नव्हते. कारण त्यांनी दोन महिन्याचं आगाऊ भाडंही दिलं होतं. 21 मार्चपासून शुटींग सुरू होणार होती. परंतु 16 मार्चपासूनच सिनेमाचं सारं काम बंद पडलं.

आता मेकर्सला ही भीती आहे की, अशा स्थितीत जर पाऊस आला तर सेट पूर्णपणे उध्वस्त होऊ शकतो. असं झाल्यास मेकर्सला मोठा झटका सहन करावा लागू शकतो.

मैदान सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा अमित रविंद्रनाथ शर्मा डायरेक्ट करत आहेत. त्यांनी आधीच बधाई हो सारखा हिट सिनेमा दिला आहे. बोनी कपूर हा सिनेमा प्रोड्युस करणार आहेत. हा सिनेमा तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा अनेक भाषेत रिलीज केला जाणार आहे.