‘या’ कंपनीनं प्रत्येक कर्मचार्‍याला दिला तब्बल 35 लाखाचा ‘बोनस’, सर्वांच्याच डोळ्यातआलं ‘पाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका रिअल स्टेट कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना बोनस म्हणून सुमारे ३५-३५ लाख रुपये दिले आहेत. कंपनीने आपल्या सर्व १९८ कर्मचार्‍यांना बोनस देण्यासाठी ७१ कोटी रुपये खर्च केले आहेत. बोनस चा चेक घेतल्यानंतर बरेच कर्मचारी आश्चर्यचकित झाले आणि बर्‍याच लोकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले.

अमेरिकेच्या बाल्टिमोरच्या सेंट जॉन प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीने हॉलिडे पार्टीच्या निमित्ताने बोनसबाबत जाहीर घोषणा केली. एका रिपोर्टनुसार, कर्मचार्‍यांना त्यांच्या कार्यकाळानुसार बोनसची रक्कम मिळणार आहे, परंतु बहुतांश कर्मचार्‍यांना ३५ लाख रुपये मिळणार आहेत.

कंपनीने चांगली कामगिरी केल्यामुळे कर्मचार्‍यांना जास्तीचे पैसे देण्यात येत आहेत असे कंपनीचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या जवळपास आठ राज्यांत या कंपनीने ऑफिस, रिटेल स्टोअर आणि गोदामांसाठी २ कोटी चौरस फूटाचे घरे तयार केली आहेत.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अकाउंट्स स्पेशलिस्ट डॅनिएल वलेन्झिया यांनी सांगितले की ही एक जीवन बदलणारी गोष्ट आहे. १९ वर्षांपासून तो कंपनीत कार्यरत आहे.

विशेष म्हणजे हा सुट्टीचा बोनस कंपनीने दिलेल्या वार्षिक बोनसपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष एडवर्ड सेंट जॉनने बोनसची घोषणा करताना सांगितले, ‘मला हा प्रसंग साजरा करायचा होता आणि ज्या लोकांनी हे काम केले त्यांच्यासाठी काहीतरी सार्थकी लागेल असे करायचे होते.’

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/