Real Estate Prices | ‘या’ कारणामुळं फ्लॅट-घरांच्या किंमतीत होवू शकते तब्बल 15 टक्क्यापर्यंतची वाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Real Estate Prices | घर किंवा फ्लॅटच्या किमती 10 ते 15 टक्केपर्यंत महाग होऊ शकतात. कारण रियल इस्टेट कंपन्यांची प्रमुख संस्था क्रेडाईने सिमेंट आणि पोलादच्या किमतीमध्ये झालेल्या बेहिशोबी वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. Credai ने म्हटले की, कच्च्या मालाचे दर खाली आले नाही तर निवासी संपत्तीच्या किमती 10 ते 15 टक्के वाढू शकतात. (Real Estate Prices)

 

या उद्योग संस्थेने सरकारकडे कच्च्या मालाच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्याची मागणी करत बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या साहित्यावर वस्तू आणि सेवा करात (GST) कपातीचा सल्ला दिला.

 

कन्फडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया confederation of real estate developers association of india (Credai) ने म्हटले की, बांधकामात वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये जानेवारी, 2020 पासून सातत्याने वाढ होत आहे. क्रेडाईने म्हटले की, कोविडचे प्रतिबंध आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे बांधकामात उशीर झाल्याने मागील 18 महिन्यात बांधकाम खर्चात 10 ते 15 टक्केची वाढ झाली आहे.

 

 

क्रेडाईने म्हटले की, कच्च्या मालाच्या किमती येत्या काही काळात कमी झाल्या नाही तर या गोष्टीची खुप शक्यता आहे की,
बांधकामाच्या वाढलेल्या खर्चाच्या भरपाईसाठी निवासी संपत्तीच्या किंमती 10-15 टक्के वाढतील.

 

क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया (CREDAI President Harshvardhan Patodia) यांनी म्हटले की,
आम्ही मागील एक वर्षात सातत्याने वेगवान वाढ पहात आहोत आणि येत्या काळात या किंमती खाली येण्याची किंवा स्थिर होण्याची शक्यता नाही.
अशावेळी बिल्डर वाढत्या खर्चाचा भार उचलू शकणार नाही आणि ते हा भार घर खरेदी करणार्‍या ग्राहकांवर टाकतील. (Real Estate Prices)

 

Web Title :- Real Estate Prices | home construction rates real estate prices could go up by 15 percent in fy23 says credai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा