Video : ‘सुपर ३०’च्या असली आनंद कुमार यांची ‘ब्रेन ट्युमर’शी ‘झुंज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऋतिक रोशन आणि पंकज त्रिपाठी स्टारर सुपर ३० हा सिनेमा रिलीज होण्सासाठी केवळ दोन दिवस राहिले आहेत. सिनेमाचे मेकर्स सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. आनंद कुमार ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहेत. सुपर ३० हा सिनेमा पाटण्यातील मॅथ्स टीचर आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक आहे.

इतक्या कमी वेळेत बायोपिकसाठी होकार देण्याचंही हेच कारण होतं. मुलाखतीत आपल्या मनातील गोष्ट शेअर करताना आनंद यांनी सांगितलं की, हा सिनेमा ते जिवंत असतानाच बनावा अशी त्यांची इच्छा होती. हा सर्व प्रवास त्यांना प्रत्यक्ष पाहायचा होता.

मुलाखतीत भावूक होत आनंद कुमार यांनी सांगितले की, ते कशा प्रकारे जीवन आणि मृत्यूशी आपला लढा देत आहेत. आनंद कुमार म्हणाले की, “माझ्यासाठी सर्वात चांगलं हे असेल की, मी जिवंत राहावं आणि हा सिनेमा पहावा.”

आनंद कुमार यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांना ऐकायला प्रॉब्लेम येत होता. तपासणी केल्यानंतर समजलं की, डाव्या कानाची ८९-९० टक्के ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे. अनेक तापसण्या करूनही यामागील कारण नेमकं काय आहे हे समजायला मार्ग नव्हता. यानंतर त्यांनी दिल्लीतील एका रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा समोर आलं की, प्रॉब्लेम कानात नाही, तर ब्रेनमध्ये आहे. जी नस कानांना ब्रेनशी जोडते तिथेच त्यांना ट्युमर आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या