Reality TV Show | ‘या’ ठिकाणी 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात रहावं लागतं जोडप्याला, तुम्हाला माहितीय का विचित्र रिअ‍ॅलिटी शो?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Reality TV Show | अलीकडे रिअँलिटी शोची (Reality TV Show) लोकप्रियता वाढत चालली आहे. या शोचे स्वरूप केवळ नाचणं, गाणं एवढंच राहील नाहीत तर ते त्या पलीकडे गेले आहेत. आपल्याकडे असलेल्या बिग बॉस म्हणजे भांडणाचा शो आणि खतरों की खिलाडी म्हणजे डेअरिंगचा शो मध्ये अनेक क्षेत्रातील लोक सहभागी झाले आहेत. मात्र या पेक्षाही विचित्र असा एक शो आहे की ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना राहण्यासाठी छप्पर नसतं, खाण्यासाठी पदार्थ नसतात. महत्त्वाचे म्हणजे सर्वजण नग्नावस्थेत असतात. तरुणी सहभागी झाली तरी सुद्धा. नेकेड अँड अफ्रेड असं या शोचं नाव असून तो डिस्कवरी चॅनेलवर प्रसारित होतो.

हा शो एक सर्व्हाइल शो असून जिथं कपलला कोणत्याही मदतीशिवाय 21 दिवस जंगलात राहावं लागतं.
म्हणजे त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नसतं, खाण्यासाठी काहीच नसतं आणि अंग झाकण्यासाठीही कपडे नसतात.
स्पर्धकांना स्वतःच याची व्यवस्था करावी लागते. या शो मध्ये ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा सामना ही करावा लागतो.
जंगलात विषारी कीटक आणि वन्यप्राणी आहेत. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करायचा आहे अशी एकूण परिस्थिती असून त्यामध्ये 21 दिवस राहण्याचे आव्हान आहे.
या शोची माहिती वाचून आपणाला घाम फुटला असले पण स्पर्धकांची प्रत्यक्षात काय अवस्था होत असेल याचा विचार न केलेलाच बरा.
बहुतेक स्पर्धक हा शो मध्येच सोडून जातात. स्पर्धकाला शोला जाताना आपल्यासोबत फक्त एक आवश्यक उपकरण सोबत नेण्याची परवानगी असते.
ज्यामध्ये माचिस, कुऱ्हाड, लायटर अशा वस्तू असतात. या शोच अनेक देशामंध्ये शूटिंग करण्यात आले असून यामध्ये कोणीही होस्ट नाही.
स्पर्धकां सोबत फक्त एक कॅमेरामन असतो. डिस्कवरी चॅनेल तसेच अँमेझॉन प्राइम व्हिडीओवरसुद्धा हा शो पाहू शकतो. (Reality TV Show)

Web Title :- Reality TV Show | The couple has to stay naked in the forest for 21 nights at this place, do you know why weird reality shows?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | कोवळ्या वयात मुलांना आईची गरज; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

Pune Crime | लग्न समारंभात अडथळा आणण्याची धमकी देऊन लोकांना लुबाडणार्‍या पीपीएल कंपनीवर खंडणीचा गुन्हा दाखल