मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दशियन ‘या’ गंभीर आजाराची शिकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दशियन गेल्या अनेक दिवसांपासून वेदना, सांधे सुजणे, डोकेदुखी, अशक्तपणा यांसारख्या समस्येची शिकार होती. त्यानंतर तिची रक्त तपासणी केली गेली. या चाचणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

किमचा प्रोग्रॅम ‘कीपिंग अप विद द करदाशियंस’ मध्ये सांगितले आहे की, तिचा रूमेटॉयड ऑर्थराइटिस आणि ऑटोइम्यून ल्युपसची चाचणी पॉझिटिव्ह आहे. एपिसोडमध्ये, डॉक्टरांनी चाचणीचा निकाल अनेकवेळा चुकीचा सांगून पुन्हा तपासणी करण्यास सांगितले. ऑटोइम्यून रोगात, रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशींना लक्ष्य करणे सुरू करते.

ही बातमी कळताना किमसोबत बहीण क्लो कार्दाशियन होती आणि त्यानंतर तिने बहीण कायली जेनर आणि आई ख्रिस जेनरसह ही गोष्ट सांगितली. किमने यावर्षी मेट गालामध्ये ड्रेसमुळे चर्चेत आली होती. यावेळी किमने ट्रान्सपेरेंट ड्रेस परिधान केला होता. ज्यामुळे ड्रेसमधून पाण्याचे थेंब थेंब पडल्यासारखे वाटत होते. जणू समुद्रातून आंघोळ करुन किमने मेट गाला गाठले होते, असे वाटत होते.

एका मुलाखतीत किमने असे सांगितले गेले होते की, ड्रेसमुळे तिच्या पाठीवर आणि पोटावर जखमा झाल्या होत्या. हा डिझायनर ड्रेस फिट बसल्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला असे तिने कबूल केले. किमने 2014 मध्ये रॅपर आणि फॅशन डिझायनर कान्ये वेस्टशी लग्न केले. कान्येच्या आधी किमचे 2 वेळा लग्न झाले आहे. किम कार्दाशियन नेहमीच तिच्या शब्दांमुळे वादात अडकत राहिली आहे. इतकेच नाही तर अमेरिकन टीव्ही स्टार किम ही वर्ष 2018 मध्ये इंटरनेटवर शोधली जाणारी सर्वात धोकादायक सेलिब्रिटी आहे. अलीकडेच किम चौथ्या मुलाची आई बनली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like