‘Realme 2020’ चा धमाकेदार ‘सेल’ सुरू, स्मार्टफोन्सवर ‘भन्नाट’ ऑफर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या सुरुवातीला Realme ने आपला 2020 सेल सुरु केला आहे. हा सेल फ्लिपकार्ड आणि रियलमीच्या वेबसाइटवर असणार आहे. 5 जानेवारीपर्यंत असा 4 दिवस हा सेल चालणार आहे.

सध्याच्या सेलमध्ये रियलमी फोन्सच्या किंमती विंटर सेलशी मिळत्या जुळत्या आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना Realme 3i, Realme 5s, Realme X2 आणि दुसऱ्या बजेट स्मार्टफोनवर उत्तम डिल मिळत आहेत.

सध्या कोणतेही बँक ऑफर या सेलवर मिळत नाहीत. परंतु तुम्हाला कॅशबॅक आणि एक्सचेंजची ऑफर मिळत आहे. रियलमीच्या वेबसाइटवर आता काही फोनवर 10 टक्के MobiKwik सुपरकॅश प्राप्त होईल.

तसेच ग्राहकांना नो कॉस्ट इएमआयचा ऑप्शनचा देखील फायदा मिळेल. कंपनीने वेबसाइटवर Cashify एक्सचेंज प्रोग्रामच्या माध्यमातून एडिशनल 500 रुपयाचे डिस्काऊंट देण्यात येतील.

सेल दरम्यान स्मार्टफोनवर मिळणारी ऑफरचा विचार केला तर Realme C2 5,999 रुपयात उपलब्ध होईल. यात 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज असलेले वेरिअंट आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंट ग्राहक 6,99 रुपयांत खरेदी करु शकतात. Realme C2 ड्यूड्रॉप डिस्प्ले आणि 4,000mAh च्या बॅटरीसह मिळेल.

याचबरोबर सेलमध्ये Realme 3i चे 3GB + 32GB वेरिएंटची विक्री 6,999 रुपयात होईल. यात 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 7,999 रुपयांत उपलब्ध करण्यात येईल. Realme 3i मध्ये 6.22-इंच HD+ डिस्प्ले, ऑक्टा-कोर MediaTek Helio P60 प्रोसेसर आणि 4,230mAh ची बॅटरी आहे.

याशिवाय रियलमी 2020 सेलमध्ये Realme 5s ला 9,999 रुपयांत विक्रीला आहे. याचबरोबरच Realme X2 Pro चे नवे वेरिएंटची विक्री 27,999 रुपयात होत आहे. इच्छिक ग्राहक Realme 2 Pro ला 7,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती खरेदी करु शकतात.

सेलमध्ये रियलमी X2 स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीतला उपलब्ध आहे आणि Realme XT ची विक्री 15,00 रुपयांत होत आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/