Realme च्या या 2 स्मार्टफोनवर मिळतोय ‘भरघोस’ डिस्काऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Flipkart वर 17 फेब्रुवारीपासून मोबाइल बोनांजा सेलचे आयोजन करण्यात आले होते. आज त्याचा अखेरचा दिवस आहे. या सेलमध्ये Xiaomi, Samsung, Motorola, Vivo, OnePlus आणि Realme सारख्या मोठ मोठ्या ब्रॉंडच्या स्मार्टफोनवर डिल्स आणि डिस्काऊंट मिळत आहे. तसेच एक्सिस बँक क्रेडिट, डेबिट कार्डवर 10 टक्के इंस्टेंट डिस्काऊंट दिले जात आहे.

सध्या या सेलवर दोन रिअलमी फोनची विक्री होत आहे, हे फोन आहेत Realme 5 आणि Realme 5 Pro. या फोनवर मोठे डिस्काऊंट आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Realme 5 ची किंमत 8,499 रुपये आहे. ही किंमत 3GB रॅम + 32GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची आहे. तर Realme 5 Pro च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज असलेले वेरिएंट 11,999 रुपयात उपलब्ध आहे.

Realme 5 फोन 9,999 रुपयात सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आला होता. Realme 5 Pro फोन 13,999 रुपयांत उपलब्ध करुन दिला होता.

Realme 5 स्पेसिफिकेशन –
या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला 3 प्रोटेक्शनसह 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अॅण्ड्राइड 9 पाय बेस्ट ColorOS देण्यात आला आहे आणि क्वॉलकॉम स्नॅपडॅगन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे.
स्मार्टफोनला क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे, यात 12MP+8MP+2MP+2MP असे 4 कॅमेरे देण्यात आले आहेत. याची बॅटरी 5,000 mAh ची आहे.

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन –
या फोनमध्ये 6.3 इंचचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 712 स्नॅपडॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वॉड कॅमेरा देण्यात आला असून 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरा 16 MP चा देण्यात आला आहे.

यात 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि 20W VOOC 3.0 फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्पार्कलिंग ब्लू आणि क्रिस्टल ग्रीन कलर असे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.