5000 mAh ची बॅटरी आणि 4 कॅमेर्‍यासह लॉन्च झाला Realme 5i, जाणून घ्या फीचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिअलमीने आपला Realme 5i हा स्मार्टफोन विएतनाममध्ये लॉन्च केला आहे. भारतात हा मोबाइल 9 जानेवारीला लॉन्च होईल. Realme 5i हा मोबाइल मागील वर्षा लॉन्च झालेल्या Realme 5 चे अपग्रेड वर्जन आहे. या फोनची खासियत म्हणजे यात चार रिअर कॅमेरा आहेत. याशिवाय यात 5000 एमएचची बॅटरी आहे.

या फोनची विएतनाममधील किंमत –

Realme 5i च्या 3 जीबी आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअटची किंमत VND 3,690,000 म्हणजे 11,500 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या वेरिअंटची किंमत VND 4,290,000 म्हणजेच 13,500 रुपये आहे. हा फोन ब्ल्यू आणि ग्रीन रंगात मिळेल.

या फोनच्या स्पेसिफिकेशनचा विचार केला तर Realme 5i डुअल सिम सपोर्ट आहे, यात अ‍ॅण्ड्राइड पाई 6.0.1 मिळेल. फोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी एस डिस्प्ले आहे ज्याचे रिजॉल्युशन 720×1600 पिक्सल आहे. फोनला वॉटरड्रॉप नॉच मिळेल. याशिवाय गोरिला ग्लास 3 प्लसचे प्रोटेक्शन देखील मिळेल. फोनमध्ये क्वॉलकॉम ऑक्टॉकोर स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम मिळेल.

Realme 5i चा कॅमेरा फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत ज्यात एक कॅमेरा 12 मेगापिक्सल, दुसरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल तर चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असेल. तर सेल्फीमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा येईल. कॅमेराबरोबर 4 के रेकॉर्डिंग मिळेल.

Realme 5i ची बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी या फोनमध्ये 5000 एमएएची बॅटरी आहे. तर मेमरी कार्डसाठी 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 4 LTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई आणि जीपीएस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/