4 रिअर कॅमेर्‍यासह Realme 5i भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Realme 5i भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा मोबाइल लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओद्वारे लॉन्च केला. Realme 5i हा मोबाइल मागील वर्षी लॉन्च झालेल्या Realme 5 चे अपग्रेड वर्जन आहे. या फोनची खासियत म्हणजे यात चार रिअर कॅमेरा आहेत. याशिवाय यात 5000 एमएएचची बॅटरी आहे. या नव्या स्मार्टफोनची स्पर्धा Redmi Note 8 आणि सॅमसंग Galaxy M20 शी असेल.

Realme 5i ची किंमत भारतात 8,999 रुपये असेल. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टेरेज वेरिएंट असेल. हा फोन एका ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन रंगात उपलब्ध होईल. याची विक्री 15 जानेवारीपासून बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. ग्राहक हा फोन फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवरुन खरेदी करु शकतात. जिओ यूजर्सला रिअलमीच्या ऑफरमध्ये 7,550 रुपयांचे बेनिफिट्स मिळेल. तसेच MobiKwik च्या माध्यमातून 10 टक्के सुपरकॅश मिळेल. याशिवाय ग्राहकांना Cashify च्या माध्यमातून एक्सचेंज डिस्काऊंट देखील मिळेल. Realme 5 भारतात सुरुवातीला 9,999 रुपयांनी लॉन्च करण्यात आला होता.

स्पेसिफिकेशन
यात डुअल सिम सपोर्ट असेल. हा स्मार्टफोन अ‍ॅण्ड्राइड 9 पाई बेस्ट ColorOS 6.1 वर चालेल आणि त्यात 269ppi पिक्सल डेनसिटी आणि 20:9 ऐस्पेक्ट रेश्योसह 6.52 इंच HD+ (720×1600 पिक्सल) इन सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डिस्प्ले पॅनल प्रोटेक्शनसाठी 2.5 डी कर्व्ड कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चा सपोर्ट असेल. या स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅमसह ऑक्टा कोर क्ल्वॉलकॉम स्नॅपड्रायगन 665 हा प्रोसेसर असेल.

Realme 5i च्या कॅमेरा फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत ज्यात एक कॅमेरा 12 मेगापिक्सल, दुसरा 8 मेगापिक्सल, तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल तर चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असेल. तर सेल्फीमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेराबरोबर 4 के रेकॉर्डिंग मिळेल.

Realme 5i ची बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
या फोनमध्ये 5000 एमएएची बॅटरी आहे. तर मेमरी कार्डद्वारे मेमरी 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 4 LTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई आणि जीपीएस देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट देण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/