5 मार्चला लॉन्च होणार Realme 6 सीरिज, ‘भाईजान’ सलमान असणार ‘ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Realme 6 आणि Realme 6 Pro 5 मार्च रोजी भारतात लाँच होणार आहे. रिअलमीनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीनं ही अशीही माहिती दिली आहे की, बॉलिवूड स्टार सलमान खान या कंपनीचा नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणार आहे. कंपनीनं एक पोस्टरही रिलीज केलं आहे. यात सलमान खान अपकमिंग स्मार्टफोनसोबत पोज देतान दिसत आहे.

चीनी कंपनी रिअलमीनं Realme 6 सीरीजसाठी ब्लाईंड ऑर्डर सेलची घोषणा केली आहे. याचं आयोजन आज म्हणजेच 26 फेब्रुवारीपासून 4 मार्चपर्यंत असणार आहे.

कंपनी आपल्या लाँचिंग इव्हेंटमध्ये Realme 6 सीरीजसोबत Realme Band ही लाँच करणार आहे. इव्हेंटची सुरुवात 12.30 pm IST ला होणार आहे. याची लाईव स्ट्रीमिंग होण्याची शक्यता आहे.

Realme 6 सीरीज लाँच करण्याआधीच कंपनीनं फोनचे काही फीचर्सही सांगितले आहेत. या सीरीजमध्ये 90Hz FHD+ डिस्प्ले, इन – डिस्प्ले कॅमेरा आणि 30 W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

आजपासून सुरू झालेल्या ब्लाईंड सेलमध्ये ग्राहक 1000 रुपये डिपॉझिट देऊन Realme 6 आणि Realme 6 Pro प्रीऑर्डर करू शकतात. Realme 6 बुक करणाऱ्या ग्राहकांना Realme Buds 2 गिफ्ट दिले जाणार आहेत. Realme 6 Pro बुक करणाऱ्या ग्राहकांना Realme Buds Wireless साठी 1000 रुपयांचं व्हाऊचर दिलं जाणार आहे. 16 मार्च रोजी हे ग्राहकांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे.

Realme 6 मध्ये सिंगल पंच होल कटआऊट मिळणार आहे. रिअर कॅमेऱ्यात 64 MP क्वाड कॅमेरा सेटअप दिलं जाणार आहे. याशिवाय प्रायमरी कॅमेऱ्याव्यतिरीक्त यात 20 x झूम सपोर्टसोबतच टेलीफोटो लेंस, एक वाईड अँगल लेंस आणि अल्ट्रा मॅक्रोही असणार आहे. तर Pro मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा असणार आहे.