48MP कॅमेराचा Realme स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त; किंमत तर…

नवी दिल्ली : सध्या नवंनवे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध होत आहेत. काही कंपन्यांचे स्मार्टफोन स्वस्तात आहेत तर काही महागडे. पण आता Realme या स्मार्टफोन निर्माता कंपनीकडून आपल्या फोन्सच्या खरेदीवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. त्यानुसार, 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन खूपच स्वस्त मिळत आहे.

Realme ने आपल्या वेबसाईटवर Realme डेज सेलचे आयोजन केले आहे. या सेलदरम्यान, विविध प्रॉडक्टवर डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये स्मार्टफोनसह टीव्हीचाही समावेश आहे. या ऑफरनुसार, बरेचसे प्रॉडक्ट स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात.

Realme 6i :

Realme या कंपनीच्या Realme 6i या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. Realme कंपनीचा हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Realme 4GB+64GB हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. तर 6GB+64GB व्हेरियंटचा स्मार्टफोन 13,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येऊ शकेल.

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स –

–    डिस्प्ले – 6.5-इंच फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सल)

–    अँड्रॉयड – 10

–    कॅमेरा – 48MP रिअर आणि 16MP सेल्फी कॅमेरा

–    बॅटरी – 4300mAh

–    चार्जिंग – फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी (अवघ्या 55 मिनिटांत फुल्ल चार्ज)