Realme चा स्मार्ट TV आणि Watch 25 मेला होणार भारतात लॉन्च

नवी दिल्ली – आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची सगळेच वाट पाहत असतात. सर्वांना पडवडणारा आणि वापरायला चांगला असा स्मार्ट फोन हा तर चर्चेचा मुद्दा असतो. भारतीय ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आपली इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करणारा Realme हा स्मार्टफोन ब्रँडही आपली दोन नवी उत्पादनं घेऊन भारतीय बाजारपेठेत येत आहे. लॉकडाउनमुळे थेट बाजारात विक्री करणं अवघड होत आहे.


तरीही कंपनीने उत्पादन लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. 25 मेला Realme SmartTV आणि Realme SmaratWatch ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. LEAP to NEXT अशी जाहिरात कंपनीने केली आहे. या उत्पादनांचं लाँच करण्यासाठी ऑनलाइन इव्हेंट करण्यात येणार आहे. हा ऑनलाइन इव्हेंट कंपनीच्या YouTube चॅनेलवरून स्ट्रिम केला जाणार आहे. तसेच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही हा इव्हेंट स्ट्रीम होईल असंही कंपनीने म्हटलं आहे.