जाणून घ्या Realme C21 स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स, 5 मार्च रोजी होणार लॉन्च

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Realme C सीरीजचा आगामी स्मार्टफोन Realme C21 ५ मार्च रोजी लाँच केला जाणार आहे. एका टीजरद्वारे कंपनीकडून याची घोषणा करण्यात आली आहे. रियलमी मलेशियाच्या फेसबुक पेजवरून हा टीजर लाँच केला आहे. यामध्ये त्या हँडसेटच्या काही फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे.रियलमीकडून स्पष्ट करण्यात आले आहे कि, रियलमी सी २१ मध्ये एक मोठी स्क्रीन दिली जाणार आहे. AliExpress च्या लिस्टिंगवरून हे समजले आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लू या दोन कलर मध्ये उपलब्ध होणार आहे. चला तर रियलमीच्या या फोनसंबंधी जाणून घेऊया.

Realme C21 हा स्मार्टफोन ५ मार्च रोजी लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच त्याची काही खास फीचर्स ऑनलाइन लीक करण्यात आले आहेत. AliExpress वर रियलमी सी २१ याआधीच लिस्ट करण्यात आला आहे.

Realme C21 या स्मार्टफोनचे फीचर्स
१. सी २१ मध्ये ६.५२ इंचाचा एलसीडी (720 X 1600 पिक्सल) रेजॉलूशन स्क्रीन असणार आहे.
२. हँडसेटमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात येणार आहे.
३. या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर देण्यात येणार आहे.
४. रियलमी सी २१ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.
५. फोनमध्ये रियरवर एक ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.
६. रियलमीच्या या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर देण्यात आले आहेत.
७. फोनमध्ये रियरवर एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा देण्यात आले आहे.
८. डिव्हाइसमध्ये मायक्रो यूएसबी पोर्ट, ३.५ एमएम ऑडियो जॅक आणि दोन सिम स्लॉट देण्यात आले आहे.
९. या फोनची साधारण किंमत ११ हजार २०० रुपये ते ११ हजार ८०० रुपयांच्या आसपास असणार आहे.