‘Realme C3’ फोन आज भारतात लॉन्च, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आज भारतात रियलमी सी ३ (Realme C3) लाँच करण्यात येणार आहे. हा फोन Realme C2 चा अपग्रेडेट फोन असून नुकतीच या फोनची डिझाईन समोर आली आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. तसेच हा मीडियाटेक Helio G70 चिपसेट देखील येणार आहे. दरम्यान आज दुपारी १२:३० ला रियलमी सी ३ लाँच झाला असून या लाँच संबंधीचा कार्यक्रम कंपनीच्या युट्युब चॅनेलवरून लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

Realme India च्या अधिकृत फेसबूक पेज आणि ट्विटर वरून या लाँच इव्हेंटचे लाईव्ह अपडेट पाहू शकणार आहात. भारतात लाँच होणाऱ्या या फोनची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतात जेव्हा Realme C2 लाँच करण्यात आला होता तेव्हा त्याची किंमत ही ५ हजार ९९९ रुपये होती. आता यात काही बदल करण्यात आले असून Realme C3 या मॉडेलमध्ये गेमिंगवर फोकस करण्यात आले आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता ५ हजार एमएएच आहे. हेच कारण आहे Realme C2 पेक्षा Realme C3 ची किंमत जास्त असणार आहे.

रियलमीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये सांगितले आहे की, Realme C3 च्या फोनचा डिस्प्ले हा ६.५ इंच असणार आहे. तर वॉटरड्रॉप स्टाइल नॉच सह असणार आहे. या फोनबरोबर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात येणार आहे. तसेच या फोनच्या डिस्प्लेचा स्क्रीन- टू- बॉडी रेशिओ ८९:८ टक्के असणार आहे. तसेच Realme C2 या फोनबरोबर Mediatek Helio G70 चिपसेट देण्यात येणार असून ऑक्टा कोर प्रोसेसर देखील सोबत असणार आहे. Realme C3 हा हँडसेट ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारांमध्ये लाँच केला जात आहे.