स्वस्तात मस्त ! रियलमी C3 भारतात ‘लॉन्च’, किंमत ‘फक्त’ 6999 रूपये, जाणून घ्या ‘फीचर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लेटेस्ट प्रोसेसर आणि उत्कृष्ट कॅमेरा अशी ओळख या रियलमी मोबाईलची आहे. याआधी कंपनीने सी १ आणि सी २ बाजारात लॉन्च केले होते. त्याला मिळणारी प्रसिद्धी आणि विक्रीचा प्रतिसाद पाहता रियलमीने सी ३  बाजारात आणला असून तो फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ग्राहकांना उपलब्ध होईल. तेथून ग्राहक खरेदी करू शकतात.

आज साडेबारा वाजता हा मोबाईल भारतात दाखल झाला. त्याचे लाइव्ह प्रक्षेपण यु ट्यूब च्या अधिकृत चॅनेल वरून सुरु होते. हा फोन खरेदी करतांना ग्राहकांसमोर दोन पर्याय असतील पहिला म्हणजे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज तसेच दुसरा पर्याय म्हणजे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असून त्यांची किंमत अनुक्रमे ६९९९ आणि ७९९९ अशी आहे. फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या संकेतस्थळावरून १४ फेब्रुवारी पासून विक्री सुरु होणार आहे.

रियलमी C3 वैशिष्ट्ये –

या फोनची वैशिष्ट्ये अशी आहेत की त्याचा डिस्प्ले स्क्रीन साडे सहा इंचाचा असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास देण्यात आला आहे. यात दोन कॅमेरे देण्यात आले असून १२ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सल चा लेन्स देण्यात आला आहे. तर ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. यामध्ये एचडी व्हिडीओ कॉलिंग सुविधा आहे. मोबाईल बॅटरीची क्षमता ५००० एमएएच आहे.