खुशखबर ! ‘रियलमी’च्या ‘या’ स्मार्टफोनवर ‘भरघोस’ सूट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘रियलमी’चे मोबाईल खरेदी करायचे असल्यास ग्राहकांना उत्तम संधी चालून आली आहे. १० फेब्रुवारीपासून ‘रियलमी डेज सेल’ सुरु झाला असून तो सेल १३ फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार आहे. रियलमीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर हा सेल चालू असून मोबाइलसोबत रियलमीच्या गॅजेट्स वरती सुद्धा चांगल्या ऑफर्स सुरू आहे.

या सेलमध्ये फ्लिपकार्टवर ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे आणि ईएमआयच्या व्यवहारावर तात्काळ दहा टक्के सूट देण्यात येणार आहे, त्याचबरोबर अ‍ॅक्सिक्स बँकेच्या कार्डवर ५ टक्के सूट मिळणार आहे आणि एक्सचेंज बोनस देखील ग्राहकांना मिळणार आहे. रियलमी डेज सेल साठी realme.com या वेबसाइटवर काही फोनवर बिना व्याजाचे ईएमआय आणि सुपरकॅशचा देखील आनंद ग्राहकांना लुटता येणार आहे.

Realme 5 Pro
या मोबाइलवरती ग्राहकांना तीन हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ४ जीबी रॅमचा फोन ११ हजार ९९९, ६ जीबी रॅमचा फोन १२ हजार ९९९ आणि ८ जीबी रॅम चा फोन १४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Realme C2
२ जीबी रॅमचा फोन ५ हजार ९९९, तर ४ जीबी रॅम चा फोन ६ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार असून, त्याच्या बॅटरीची क्षमता ५००० एमएच एवढी आहे. हे दोन्ही फोन ३२ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहेत.

Realme X2 Pro
या स्मार्टफोनवर ग्राहकांना २००० हजार रुपयांची सूट मिळणार आहे. सेलमुळे २९ हजार ९९९ किमतीचा फोन फक्त २७ हजार ९९९ खरेदी करता येणार असून ८ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत २९ हजार ९९९ आणि १२ जीबी रॅम च्या फोनची किंमत हि ३१ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

Realme X2
या मोबाईलवर ग्राहकांना तब्बल एक हजारपर्यंत सूट देण्यात येणार आहे. या फोनवरती फ्लिपकार्टच्या ऑफरमुळे ४ जीबी रॅम च्या फोनची किंमत १६ हजार ९९९ तर ६ जीबी रामच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ आणि ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ इतकी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सेलचा जास्तीत जास्त फायदा ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कंपनीने केले आहे.