खुपच स्वस्त मिळतोय Realme चा 4 कॅमेराचा बजट स्मार्टफोन, मिळेल 6000 mAH ची दमदार बॅटरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिअलमीने आपल्या प्लॅटफॉर्मवर ‘रिअलमी फेस्टिव्ह डे’ ची सुरूवात केली आहे. 29 ऑक्टोबरपासून विक्रीला सुरुवात झाली आहे आणि त्याचा शेवटचा दिवस 4 नोव्हेंबरला आहे. कंपनीने ‘कनेक्ट फॉर रीअल दिवाळी’ अशी या सेलची टॅगलाईन ठेवली आहे. सेलमधील फोनवर अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत, त्यापैकी काही फोन असे आहेत, ज्यांची किंमत आधीच बजेट विभागात आहे. ऑफरबद्दल बोलायचे म्हणले तर, रिअलमी सी 15 खूप चांगल्या डीलमध्ये खरेदी केला जाऊ शकते.

रिअलमी सी 15 क्वालकॉम एडिशन आता 1500 रुपयांत स्वस्त उपलब्ध आहे. पहिल्या फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये होती, आता ती 8,499 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य 4 जीबी रॅम व्हेरिएंट 10,999 रुपयांऐवजी 9,499 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. माहितीसाठी, कंपनीने या फोनच्या क्वालकॉम एडिशनला नुकतेच लॉन्च केले आहे. याआधी याला फक्त मीडिया टेक हेलिओ जी 35 चिपसेटसह सादर केले होते.

फोनची वैशिष्ट्ये
या रियलमी डिव्हाइसमध्ये 6.5 इंच एचडी + (720×1600 पिक्सेल) डिस्प्ले 20: 9 स्पेक्ट रेशियोसह आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसरसह सुसज्ज आहे आणि 4 जीबी पर्यंत एलपीडीडीआर 4 एक्स रॅमसह येतो.

मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनमध्ये मिळणाऱ्या 64 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेजला 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ग्राहक हा फोन पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. फोनच्या मागील पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाले तर फोनच्या क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 13 – मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 8 – मेगापिक्सलचा दुय्यम सेन्सर, 2 – मेगापिक्सलचा मोनोक्रोम आणि 2-मेगापिक्सलचा रेट्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी Realme C15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.