होय ! अभिनेत्री कॅटरीना कैफमुळे ‘भाईजान’ सलमानचा ‘इंशाअल्लाह’ बंद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खानचा इंशाअल्लाह हा सिनेमा अचानक बंद पडल्याने चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पहायला मिळत आहे. कारण काहीही मनात नसताना चाहत्यांना हा सिनेमा बंद पडल्याचं समजत आहे. सिनेमा बंद पडण्याचे नेमके कारण काय याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. हा सिनेमा बंद पडण्यामागचे कारण अभिनेत्री कॅटरीना कैफ असल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

Happy birthday Katrinaaa… @katrinakaif

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

चित्रपट समीक्षक राजीव मसंदने याबाबत खुलासा केला आहे. एका मॅगझिनच्या स्तंभात त्याने याबाबत लिहिलं आहे. राजीव मसंदच्या स्तंभानुसार, सलमान खानला इंशाअल्लाह या सिनेमात कॅट हवी होती. यासाठी त्याने काही प्रयत्न केले. त्याने संजय लीला भन्साळींवर दबावही टाकला. सलमानने कथेत बदल करण्याचा प्रयत्न केला, परंतु भन्साळींना ते रुचले नाही. त्यांनी यासाठी नकार दिला. इतकेच नाही तर बहिण अर्पिताला वेशभूषेची जबाबदारी देण्याची मागणीही त्याने केली असेही समजत आहे. परंतु भन्साळींना काहीच मान्य नसल्याने त्यांनी थेट पॅकअपची घोषणा केली.

भन्साळी आणि सलमान यांनी खामोशी आणि हम दिल दे चुके सनम या सिनेमात एकत्र काम केलं आहे. इंशाअल्लाहच्या निमित्ताने सलमान आणि भन्साळी तब्बल 20 वर्षांनी एकत्र काम करणार होते. याशिवाय आलिया सलमान आणि भन्साळी अशा दोघांसोबतही पहिल्यांदाच एकत्र काम करणार होती. खास बात अशी की, आलियाने या सिनेमासाठी आमिर खानच्या एका सिनेमाला नकार दिला होता.

View this post on Instagram

#Bharat @bharat_thefilm

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

Visit : policenama.com

 

You might also like