Reason For Belly Fat Gain | चरबी का वाढते? तज्ज्ञांनी शोधलं याचं कारण, जाणून घ्या कशी करावी सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Reason For Belly Fat Gain | पोटाची चरबी (Belly Fat) वाढल्याने शरीराचा लूक तर खराब होतोच, शिवाय अनेक रोगांना आमंत्रण मिळते. पोट, आतडे आणि यकृत (Stomach, Intestine And Liver) यासारख्या अवयवांवर जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्याने ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे बद्धकोष्टता, हृदयरोग (Constipation, Heart Disease) आणि इतर अनेक जुन्या आजारांचा धोका वाढतो (Reason For Belly Fat Gain).

 

आपल्या दैनंदिन आहारातील अनेक घटक लठ्ठपणा (Obesity) आणि पोटातील चरबी वाढवू शकतात. तसेच राहणीमानाचाही परिणाम होतो. कार्यालयात जर बसून काम असेल तर व्यायाम (Exercise) अजिबात होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. दुर्दैवाने, गेल्या दशकभरात जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण खूप वाढले आहे. दरम्यान, पोटातील चरबी का वाढली हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घेऊयात त्याची कारणं (Reason For Belly Fat Gain).

 

पोटाची चरबी कशी कमी करावी (How To Reduce Belly Fat) –
पोटातील चरबी किंवा लठ्ठपणा वाढण्याचे एक प्रमुख कारण, शारीरिक निष्क्रियता हे आहे. दीर्घकाळ बसून राहणे, अनारोग्यकारक अन्न आणि व्यायामाचा अभाव यासह बैठी जीवनशैलीमुळे (Sedentary Lifestyle) लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढत आहे. दर आठवड्याला फक्त १५० मिनिटांचा वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो.

 

आतड्यात चरबी जमा झाल्याने लठ्ठपणा वाढतोच. परंतु तणाव आणि चिंता (Stress And Anxiety) ही कारणे देखील प्रमुख आहेत, अशी माहिती जामा सायकाट्रिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.

झोपेचा अभाव (Lack Of Sleep) –
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक मानले जाते. झोप होत आतड्यांमधील चरबी वाढू लागते. जे लोक दररोज रात्री झोप पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यात इन्सुलिन प्रतिरोध, चिडचिडेपणा (Insulin Resistance, Irritability) आणि लठ्ठपणा निर्माण होतो. ओटीपोटात चरबी आणि इतर जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी कमीतकमी सात तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

 

धूम्रपान हानिकारक (Smoking Harmful) –
धूम्रपान (Smoking) केल्याने श्वसनाचे आजार (Respiratory Diseases) आणि फुफ्फुसांचा कर्करोग (Lung Cancer
यासारखे गंभीर आजार या सवयीपासून तुम्ही ताबडतोब स्वत:ला दूर केलं पाहिजे.
धूम्रपान केल्याने मधुमेहाचा धोका (Risk Of Diabetes) वाढू शकतो,
असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये (American Journal of Clinical Nutrition) प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.

 

तणाव घालवा (Relieve Stress) –
अधिक ताण घेण्याची सवय केवळ मानसिक आरोग्यावरच (Mental Health) नव्हे, तर शारीरिक तंदुरुस्तीवरही परिणाम करू शकते.
जामा सायकेट्रिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक जास्त चिंता आणि तणावाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.
त्यांच्यात लठ्ठपणा होण्याचा धोका देखील जास्त असतो. लठ्ठपणामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Reason For Belly Fat Gain | reason for belly fat gain how to prevent stomach fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का?’

 

Pune Crime | वार्षिक 36 % परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांची 11 कोटीची फसवणूक, पुण्यातील झेन मनी प्लॅन्टच्या संचालकांसह 6 जणांवर FIR

 

Pune Crime | शिवाजीनगर परिसरातील शाळेत घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये बलात्कार करणारा नराधम अटकेत