पोटात ‘गॅस’ होत असल्यास आजपासूनच बंद करा ‘या’ गोष्टी

बदललेल्या जीवनशैलीमुळे पोटात गॅस होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पोटात गॅस होण्याची विविध कारणे आहेत. काही गोष्टी टाळल्या आणि योग्य ती काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. तळलेले पदार्थ म्हणजे भजे, सामोसे आणि कचोरीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि यामुळे पोटात गॅस तयार होऊ लागतो. त्यामुळे असे पदार्थ खाऊ नयेत.

पोटात गॅस होत असल्यास फॅट असलेले दूध, चीज यासारखे डेअरी प्रोडक्ट्स आहारात घेऊ नयेत. कारण यामध्ये असलेले फॅट पचत नाही. यामुळे गॅसची समस्या निर्माण होते. तसेच बिअर आणि वाईन शरीरात अ‍ॅसिड निर्माण करते. याचे जास्त प्रमाण झाल्यास पोटात गॅस तयार होऊ लागतो. शिवाय सोडा आणि कोल्ड्रिंकमध्ये कार्बनडायऑक्साइड बबल्स आढळून येतात, जे पोटात जाऊन अ‍ॅसिड तयार करतात. यामुळे पोटात गॅसची समस्या सुरु होते. त्यामुळे सोडा, थंडपेये टाळावीत. प्रोसेस्ड फूड म्हणजेच कुकीज, ब्राउनीज आणि मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पटत लगेच गॅस तयार होऊ लागतो. यामुळे असे पदार्थ ताबडतोब बंद करावेत.

सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्यास अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. यामुळे पोटात गरजेपेक्षा जास्त अ‍ॅसिड तयार होऊन गॅसची समस्या निर्माण होते. यासाठी काम करताना अधूनमधून उठावे आणि थोडे चालावे. दररोज सकाळी चालण्याचा व्यायाम करावा. घाईघाईत अन्न खाल्ल्यानेही पोटात गॅस होतो. असे केल्यास अन्न व्यवस्थित चावले जात नाही आणि यामुळे अन्न पचण्यास वेळ लागतो आणि अ‍ॅसिड तयार होऊ लागते. यामुळे गॅसची समस्या होते. तसेच रात्री खूप वेळ जागरण केल्यास अपचनाची समस्या निर्माण होऊ लागते. यामुळे पोटात गॅस तयार होतो.

Loading...
You might also like