म्हणून विवाहित स्त्रियांकडे आकर्षित होतात तरुण मुले 

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमाचे विश्व हे व्यापक आणि रम्य असते. प्रेमाच्या जगात कोण कुणाला आवडेल हे काही सांगता येत नाही. तसेच विवाहित महिला मुलांना अधिक भावतात याची काय कारणे आहेत ? याचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले आहे कि ,  मुले विवाहित स्त्रीशी रिलेशन ठेवण्यासाठी आग्रही असतात कारण त्यांना त्यात सुरक्षितता वाटते.

विवाहित स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो 
विवाहित स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो त्यामुळे त्या आत्मविश्वासाचे मुलांना आकर्षण असते म्हणून अशी मुले विवाहित स्त्रियांशी आपल्या प्रेमाचे सूत जुळतात. तसेच विवाहित स्त्रिया हि या मुलांना अधिक प्रेम देतात. तसेच मुलींच्या रिलेशन प्रमाणे विवाहित स्त्रिया रिलेशन मध्ये टेंशन देत नाहीत.

समजून घेण्याची वृत्ती 
वाढत्या वयात माणसाला आपले ताण तणाव हलके करण्यासाठी जोडीदाराची गरज भासू लागते. कोणा जवळ तरी बोलून ताण तणाव हलके करण्याचा प्रयत्न तरुण वयातील स्त्री अथवा पुरुष करत असतो. लग्न झालेल्या स्त्रिया या आपल्या पेक्षा लहान मुलांना चांगले समजून घेतात म्हणून मुले लग्न झालेल्या स्त्रियांच्या सोबत रिलेशन ठेवतात.

शारीरिक बदल 
लग्नानंतर दररोज मिळणाऱ्या शरीर सुखामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोनलमध्ये बदल होतात म्हणून स्त्रियांच्या चेहऱ्यावरील ग्लो वाढतो. त्या अधिक आकर्षक आणि मादक दिसू लागतात. म्हणून तरुण मुले त्यांना भाळतात. स्त्रीच्या आकर्षण दिसण्यावरच मुले भुलतात असे नाही तर त्यांच्या बोलण्या चालण्याचे हि  मुलांना आकर्षण वाटते. तसेच विवाहित स्त्री सोबत नाते बनवायला मुलांना सुरक्षितता वाटते.

मल्टिटास्किंग अनुभव 
लग्न झालेल्या स्त्रीवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. त्यामुळे त्यांच्यात घराबाहेर पडून काम करण्याचे कौशल्य अवगत होते. विवाहित स्त्रियामध्ये मल्टिटास्किंग काम करण्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. अशा सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या स्त्री सोबत रिलेशन ठेवायला मुलांना आवडते.

विवाहित स्त्री सोबत जरी आपले प्रेम संबंध असले तरी प्रेम हे प्रेम असते. त्यामुळे प्रेमाची व्यापकता ओळखता आली पाहिजे. परंतु प्रेमात वेगळे सौंदर्य असते ते माणसाला जपता आले पाहिजे. भविष्यात आपणच केलेल्या कृतीची आपणालाच लाज वाटेल असे किळसवाणे प्रेम आपण करू नये. तसेच दोघाच्या राजी खूशी शिवाय विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणे योग्य नाही हे हि आपण जाणले पाहिजे.

You might also like