‘या’ कारणामुळं देवेंद्र फडणवीसांनी अद्याप ‘वर्षा’ बंगला सोडला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा राज्यात भाजप सरकार स्थापन होईल याच्या शक्यता मावळत चालच्या आहेत. राज्यपालांना राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता राज्याचे माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी असलेला सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. परंतू सध्या तरी ते वर्षा बंगला सोडणार नाहीत. त्यांचा मुक्काम अजून तरी काही तीन महिने वर्षावरच असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर राहायची मुदत आणखी 3 महिन्यांनी वाढून घेतली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील काही दिवस तरी वर्षा बंगल्यावर मुक्काम असणार आहे.

भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत येत नाही अशी चिन्ह आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयासह इतर मंत्री कार्यालये आणि मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यावर सामानाची बांधाबांध सुरु झाली आहे. शिवसेनेचे युतीत बिसल्यावर आता महाशिवआघाडी सत्तास्थापनेच्या दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे सत्तावाटपाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर यांच्या मंत्रिमंडळाने मानण्यात येतो. राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने मंत्री कार्यालयातील साहित्य आणि मंत्री दालनाचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढण्यात आले. त्या अनुषंगाने अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील संगणक, झेरॉक्स मशिन, टेलिफोन आणि साहित्य सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आले.

सध्या मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर शांतता आहे. परंतू वर्षा या निवासस्थानी ते पुढील काही महिने तरी राहतील. शासकीय नियमानुसार मानवतेच्या दृष्टीकोनातून मंत्र्यांना तीन महिन्याचा कालावधी देण्यात येतो. त्यानुसार फडणवीस यांना हा कालवधी वाढून दिला आहे. या वेळेत फडणवीस यांना नवे निवासस्थान शोधावे लागणार आहे.

Visit : Policenama.com