…म्हणून सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि शिल्पा शेट्टी या दोघांनी ‘औजार’, ‘गर्व : प्राईड अँड ऑनर’, ‘फिर मिलेंगे’ आणि ‘शादी कर के फंस गया यार’ यांसारख्या अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. सध्या सलमान खान आपला आगामी सिनेमा ‘भारत’मुळे चर्चेत आहे. तर शिल्पा शेट्टी सध्या टीव्हीवरील टॅलेंट शोमध्ये जज असल्याचं दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी सलमान आणि शिल्पाच्या अफेअरचीही चांगलीच चर्चा रंगताना दिसली होती.

नुकताच सलमान खान आणि शिल्पा शेट्टीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. एका मुलाखतीत शिल्पा शेट्टीने आपल्या जीवनातील काही मोठे खुलासे केले होते. एकेकाळी अशीही अफवा समोर आली होती की, सलमान आणि शिल्पा एकमेकांना डेट करत आहेत. सलमान खानला डेट करण्याबाबत शिल्पा याच मुलाखतीत बोलताना म्हणाली, “मी आणि सलमान फक्त चांगले मित्र आहोत आणि यापेक्षा जास्त आमच्यात काहीच नाही.” याचवेळी शिल्पा असंही म्हणाली की, सलमान खान मध्यरात्री तिच्या घरीही यायचा.

शिल्पा म्हणाली की, “सलमान अनेकदा मध्यरात्री घरी येऊन माझ्या वडिलांसोबत ड्रिंक करायचा. त्यावेळी मी गाढ झोपलेली असायचे. सलमान माझ्या वडिलांसोबत बसून तासनतास गप्पा मारायचा. जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर सलमान घरी आला होता. त्यावेळी तो खूपच उदास होता. त्यावेळीही सलमान घरातील बार काऊंटरवर मान खाली घालून बसला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like