काय सांगता ! होय, भाईजान सलमान खान 1 BHK मध्ये राहतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये सलमान खानचे नाव घेतले जाते. मात्र असे असूनही सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. याविषयी सलमान खानने एका चॅट शोमध्ये खुलासा केला आहे.

सलमान खान म्हणाला की, ‘एखाद्या आलिशान बंगल्यापेक्षा मला माझा प्लॅट प्रिय आहे. कारण येथे माझे आई-बाबा राहतात. माझे संपूर्ण बालपण या प्लॅटमध्ये गेले आहे. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायला आवडते. मी त्यांना सोडून कोणत्याही बंगल्यात राहायला जाणार नाही. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं मला माझ्या कुटुंबासारखी आहेत. कोणाच्याही घरात जायचो. जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो.’

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर घर आहे. सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानचा दबंग 3 हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या सिनेमात साऊथ स्टार किच्चा सुदीप खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Visit : Policenama.com