मासिक पाळीदरम्यान केसांना कलर किंवा डाय करताय ? सावधान ! होऊ शकते ‘हे’ नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन टीम- केसांना मेहंदी लावणे किंवा केस काळे करणे, केसांना कलर करणे पुरुष आणि महिलांतही काही नवीन नाही. केसांना हायलाईट किंवा कलर करण्याचे फॅड आहे. पण मैत्रिणींनो मासिक पाळी येण्याआधी केसांना डाय किंवा कलर करू नका. कारण आरोग्य तज्ञांच्या मते मासिक पाळी येण्यापूर्वी स्काल्प इतर दिवसांच्या तुलनेत आधीक संवेदनशील झालेली असते. अशात डाय किंवा कलर केला तर स्काल्पला वेदना होतात. तसेच डोक्याच्या त्वचेला वेदना किंवा इजा होण्याची शक्यता असते. याबरोबरच या काळात कोणत्याही सौंदर्य ट्रीटमेंट घेणे शक्यतो टाळावे असे तज्ञांचे मत आहे.

नक्की काय होतो परिणाम ?

एका संशोधनानुसार, शरीरामध्ये एस्ट्रोजनची उच्च पातळी मेंदूला संकेत देते की, नॅचरल पेनकिलर सिस्टममार्फत इन्डॉर्फिनला रिलीज करा. जे वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. दरम्यान, एस्ट्रोजनच्या लो लेवलमुळे मेंदूची नॅचरल पेनकिलर सिस्टम काम करत नाही आणि वेदनांप्रति सेन्सिटिव्ह होतात. परिणामी स्काल्पला वेदना आणि इरिटेशन होऊ लागतं.

काय आहे याबाबतचे संशोधन ?

मासिक पाळीआधी किंवा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही तुमचे केस डाय करत असाल, तेव्हा तुम्हाला स्काल्पमध्ये इरिटेशन जाणवू लागेल. यूनिवर्सिटी ऑफ मिशिगनमधील एका टिमने 2003 मध्ये एक संशोधन केलं होतं, ज्यामध्ये असं आढळून आलं की, महिलांमध्ये एस्ट्रोजेन लेव्हल बदलते. तेव्हा त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान वेदना आणि सेन्सिटिव्हीटी जाणवते.