त्वचेवरील ‘अ‍ॅक्टीव्ह’ किटाणूंमुळं पाठीवर दाण्यांसारखे डाग पडतात, ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा सूटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  महिला आणि पुरुषांमध्ये पाठीवर दाणे येण्याची समस्या उद्भवणे सामान्य स्थिती आहे. ही समस्या कोणत्याही वयोगटात निर्माण होऊ शकते. तरुणांमध्ये हार्मोन्स बदलामुळे, तर काही जणांना अनुवांशिक कारणामुळे त्वचेची समस्या उद्भवते. मात्र, प्रत्येकाला पाठीवर आणि खांद्यावर उद्भवणाऱ्या डागांचे स्वरुप वेगळे असते. त्यातील काही लोकांना एक्नेची समस्या असते. एक्नेमध्ये पुळ्यासारखे दाणे येतात आणि ते पिकल्यानंतर फुटतात.

बहुतांश जणांच्या पाठीवर फिकट लाल रंगाचे हे दाणे येतात आणि हळूहळू त्यांच्या आकार वाढत जातो. काहींना याच्या वेदना होतात. त्याचप्रमाणे दाणे पिकल्यानंतर न फुटता आपला डाग सोडून जातात. शरिरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हे बदल घडतात. अनेकवेळा पोटा बाबत असणाऱ्या समस्याही याला कारणीभूत ठरतात. ज्यांचे पोट साफ होत नाही, पचनतंत्र सुरळीत नसते. त्यांना ही समस्या निर्माण होते.

महिलांना मासिक पाळीच्या पूर्वी या समस्या उद्भवतात. या डागांमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यवर परिणाम होतो. त्यासाठी वेळीच उपचार केले तर अशा समस्यांपासून लांब राहता येते. तसेच ही समस्या उद्भवल्यास लहान मुलांचे मनोबल वाढवायला हवे. दीर्घकाळ औषधांचे सेवन करणे सुद्धा या पाठीमागे एक कारण असू शकते. याकडे दुर्लक्ष केले तर पाठीवरुन कमरेपर्यंत हे दाणे वाढत जातात.

या डागांपासून आराम मिळवण्यासाठी हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही मोहोरीच्या तेलाने मालिश करु शकतात. यासाठी आधी राईचे अथवा नारळाचे तेल घ्या. परत त्यात अर्धा चमचा ओवा आणि ४ ते ५ बारीक कापलेले लसूण घाला. कमी आचेवर ५ मिनिट ते तेल गरम करा. तुम्हाला लसूण वापरायचा नसेल तर मेथीच्या दाण्यांचा वापर केला तरी चालेल. नंतर थंड करुन गाळून घ्या.

त्यानंतर एका बॉटल मध्ये भरुन सकाळी अंघोळ करण्यापूर्वी किंवा रात्री झोपताना या तेलाने मालिश केल्याने दाणे निघण्याची समस्या उद्भवत नाही. तद्वतच, प्रत्येकाची त्वचा वेगवगेळी असते. म्हणून कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.